AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suryavanshi : 4 चौकार-4 षटकार, वैभव सूर्यवंशीचं वादळी अर्धशतक, वर्ल्ड कप स्पर्धेत तडाखा कायम

U19 World Cup 2026 India vs Zimbabwe : वैभव सूर्यवंशी याने अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत आपला दबदबा कायम राखत झिंबाब्वेच्या गोलंदाजांची धुलाई केलीय. वैभवने त्याल डोळे दाखवणाऱ्या गोलंदाजाला बॅटिंगने खर्चापाणी दिला.

Vaibhav Suryavanshi : 4 चौकार-4 षटकार, वैभव सूर्यवंशीचं वादळी अर्धशतक, वर्ल्ड कप स्पर्धेत तडाखा कायम
Vaibhav Sooryavanshi Team IndiaImage Credit source: Bcci
| Updated on: Jan 27, 2026 | 5:30 PM
Share

अंडर 19 टीम इंडियाचा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने वर्ल्ड कप स्पर्धेत आपला तडाखा कायम ठेवला आहे. वैभवने सुपर 6 फेरीतील सामन्यात झिंबाब्वे विरुद्ध तडाखेदार खेळी करत अर्धशतक झळकावलं आहे. वैभवने नेहमीप्रमाणे मैदानात चौफेर फटकेबाजी करत अवघ्या 24 चेंडूतच अर्धशतक पूर्ण केलं. वैभवने या अर्धशतकी खेळीतील 50 पैकी 40 धावा या अवघ्या 8 चेंडूत केल्या. वैभवने अर्धशतकी खेळीत 4 चौकार आणि 4 षटकार लगावले. वैभवने 208 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने ही खेळी केली. वैभवची या स्पर्धेत 50 पेक्षा अधिक धावा करण्याची ही दुसरी वेळ ठरली. वैभवने त्याआधी बांगलादेश विरुद्ध 72 धावांची खेळी केली होती.

वैभवसोबत पंगा महागात

वैभवला या खेळीदरम्यान झिंबाब्वेच्या एका गोलंदाजाने डोखे दाखवले. मात्र वैभवला डोळे दाखवणं झिंबाब्वेच्या गोलंदाजाला चांगलंच महागात पडलं. वैभवने त्याला डोळे दाखवणाऱ्या गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली आणि धावा मिळवल्या.

नक्की काय झालं?

झिंबाब्वेचा गोलंदाज पनाशे मजाई याने पाचव्या ओव्हरदरम्यान वैभवला डोळे दाखवले. वैभवने मजाईच्या ओव्हरमधील पाचव्या बॉलवर सिक्स लगावला. वैभवने त्याच्या बॉलिंगवर सिक्स मारल्याने मजाई बावचाळला. मजाईने वैभवकडे रागात पाहत डोळे दाखवले. मात्र वैभवने त्याकडे फार लक्ष दिलं नाही. मात्र वैभवने झिंबाब्वेच्या या गोलंदाजांचा बॅटिंगने हिशोब केला आणि मस्ती जिरवली.

वैभवने मजाईच्या पुढील षटकात षटकार-चौकार लगावला. वैभवने त्यानंतर नवव्या ओव्हरमध्ये चौकार लगावला. तसेच वैभवने नवव्या ओव्हरमध्ये 1 फोर लगावला. तसेच 1 धाव घेत अर्धशतक पूर्ण केलं.

वैभवच्या खेळीचा 52 धावांवर शेवट

दरम्यान वैभव वादळी अर्धशतकानंतर काही मिनिटांनी आऊट झाला. वैभवने या सामन्यात मोठी खेळी करण्याची संधी होती. मात्र वैभव अर्धशतकानंतर 2 धावा जोडून झाल्यानंतर आऊट झाला. वैभवने 30 बॉलमध्ये 52 धावा करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला.

वैभवची या स्पर्धेत 40 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करण्याची एकूण आणि सलग तिसरी वेळ ठरली आहे. वैभव वर्ल्ड कप मोहिमेतील पहिल्या सामन्यात दुहेरी आकडा गाठण्यात अपयशी ठरलेला. वैभवने पहिल्या सामन्यात 2 धावा केल्या. वैभवने त्यानंतर अनुक्रमे 72, 40 आणि आता 52 धावा केल्या आहे. वैभवच्या नावावर अशाप्रकारे या स्पर्धेत एकूण 162 धावा झाल्या आहेत.

पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?
छोटा पुढारी गावागावात... काय आहे गावगाड्यात सुरू; गुलाल कुणाचा उधळणार?.
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले
तुम्हीही काही धुतल्या तांदळासारखे नाहीत, नाईकांना सुनावले.
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध
गायिका अंजली भारतींच्या वादग्रस्त वक्तव्यावर किशोरी पेडणेकरांचा निषेध.
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी...
आदिवासी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होतात परंतु अंमलबजावणी....
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी
औकातीत राहा... नाईक-शिंदे वादात या महिला नेत्याची उडी.
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस
आरती केली, अन्... सयाजी शिंदेंनी केला झाडाचा दणक्यात वाढदिवस.
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट
कोश्यारींना पुरस्कार मिळताच महाराष्ट्रात संतापाची लाट.
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?
पुन्हा परीक्षा पे चर्चा, भारतात किती विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग?.