IND vs PAK : भारतीय संघात निर्णायक सामन्यासाठी मोठा बदल, पाकिस्तान विरुद्ध कुणाला संधी?

U19 World Cup 2026 India vs Pakistan Toss Result and Playing 11 : सुपर 6 मधील सामन्यासाठी टीम इंडिया आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी प्लेइंग ईलेव्हनमध्ये प्रत्येकी 1-1 बदल केले आहेत. जाणून घ्या टीम इंडियात कुणाला संधी मिळाली.

IND vs PAK : भारतीय संघात निर्णायक सामन्यासाठी मोठा बदल, पाकिस्तान विरुद्ध कुणाला संधी?
Vaibhav Suryavanshi and Ayush Mhatre
Image Credit source: Getty
| Updated on: Feb 01, 2026 | 2:41 PM

आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत (Icc Under 19 World Cup 2026 ) आज 1 फेब्रुवारीला सुपर 6 फेरीतील शेवटच्या सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. हा सामना बुलावायोमधील क्विन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये आयोजित करण्यात आला आहे. सामन्याला दुपारी 1 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस करण्यात आला. पाकिस्तानने टॉस जिंकला. पाकिस्तानचा कॅप्टन फरहान यूसुफने फिल्डिंगचा निर्णय घेतला. तर भारतीय कर्णधार आयुष म्हात्रे (Ayush Mhatre) याने नाणेफेक गमावल्यानंतर प्रतिक्रिया दिली. आम्हाला फलंदाजीच पाहिजे असल्याचं आयुषने नमूद केलं.  त्यामुळे आयुषला टॉस गमावूनही जे हवं होतं ते मिळालं.  तसेच या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती आयुषने दिली.

प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल

टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदल केला आहे. उधव मोहन याला या सामन्याला मुकावं लागलं आहे. त्याच्या जागी दीपेशन देवेंद्रन याचा समावेश करण्यात आला आहे. तसेच पाकिस्ताननेही 1 बदल केलाय. पाकिस्तानने अली हसन याचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

कोण पोहचणार सेमी फायनलमध्ये?

भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघांसाठी हा सामना उपांत्य फेरीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. मात्र हा सामना जिंकणं पाकिस्तानसाठी फार अवघड असणार आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना जिंकून चालणार नाही. पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी हा सामना मोठ्या फरकाने जिंकावा लागणार आहे.

पाकिस्तानला किती फरकाने सामना जिंकावा लागणार?

पाकिस्तानला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना 90 बॉलआधी अर्थात 15 ओव्हर बाकी ठेवून विजय मिळवावा लागणार आहे. भारताने या सामन्यात 300 धावा केल्या तर पाकिस्तानला 35 षटकांआधी हे आव्हान पूर्ण करावं लागेल. अशात पाकिस्तानचा या सामन्यात चांगलाच कस लागणार असल्याचं निश्चित आहे.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : आयुष म्हात्रे (कर्णधार),वैभव सूर्यवंशी, आरोन जॉर्ज, विहान मल्होत्रा, अभिज्ञान कुंडू (विकेटकीपर), वेदांत त्रिवेदी, आरएस अंबरिश, कनिष्क चौहान, खिलन पटेल, हेनिल पटेल आणि दीपेश देवेंद्रन.

पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : हमजा जहूर (विकेटकीपर), समीर मिन्हास, उस्मान खान, अहमद हुसैन, फरहान युसफ (कर्णधार), हुजैफा अहसान, अली हसन बलोच, अब्दुल सुभान, मोमीन कमर, मोहम्मद सय्यम आणि अली रझा.