IND vs NZ : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार, सामना कधी-कुठे? जाणून घ्या

Vaibhav Suryavanshi IND vs NZ U19 : भारताचा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी याने कमी वयात असंख्य विक्रम मोडीत काढले आहेत. वैभवने वर्ल्ड कप स्पर्धेआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचं नेतृत्वही केलं होतं. आता वैभव न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे.

IND vs NZ : वैभव सूर्यवंशी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार, सामना कधी-कुठे? जाणून घ्या
Vaibhav Suryavanshi U19 Team India
Image Credit source: Bcci
| Updated on: Jan 22, 2026 | 11:03 PM

भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने भारताला 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 2-1 अशा फरकाने पराभूत केलं. न्यूझीलंडने यासह भारतात पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर आता उभयसंघात 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने नागपूरमध्ये विजयी सलामी देत या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. उभयसंघात टी 20i मालिकेचा थरार सुरु असताना अंडर 19 टीम इंडियाचा स्टार ओपनर बॅट्समन वैभव सूर्यवंशी न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

सध्या झिंबाब्वे आणि नामिबियात अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत भारताने आयुष म्हात्रे याच्या नेतृत्वात धमाकेदार सुरुवात केलीय. भारताने यूएसए आणि त्यानंतर बांगलादेशचा धुव्वा उडवला. त्यानंतर आता टीम इंडिया आपल्या मोहिमेतील साखळी फेरीतील तिसरा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना कधी?

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना शनिवारी 24 जानेवारीला होणार आहे.

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना कुठे?

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना बुलावायोतील क्विन्स स्पोर्ट्स कल्बमध्ये खेळवण्यात येणार आहे.

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामन्याला किती वाजता सुरुवात होईल?

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामन्याला दुपारी 1 वाजता सुरुवात होईल. तर 12 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?

अंडर 19 इंडिया विरुद्ध अंडर 19 न्यूझीलंड सामना मोबाईलवर जिओहॉटस्टार एपद्वारे पाहायला मिळेल.

वैभव सूर्यवंशीची कामगिरी

वैभव सूर्यवंशी याने या स्पर्धेतील शेवटच्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध धमाका केला होता. वैभवेने बांगलादेश विरुद्ध 67 चेंडूत 72 धावांची खेळी केली होती. वैभवने या खेळीत 67 चेंडूत 6 चौकार आणि 3 चौकारही लगावले होते.

तसेच वैभवने त्याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंडर 19 यूथ वनडे सीरिजमध्ये 127 धावांची खेळी केली होती. अशात वैभव तिसऱ्या सामन्यात किती धावा करतो? हे पाहणं म्हत्त्वाचं ठरणार आहे.