टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा पत्ता कट झाल्यानंतर स्कॉटलँडला संधी मिळाली आहे. आता पाकिस्तानची नाटकं सुरु झाली आहेत. त्यामुळे पाकिस्तानने माघारी घेतली तर कोणाला संधी मिळणार? ते जाणून घ्या.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून पाकिस्तानने माघार घेतल्यास कोणाला मिळणार संधी? जाणून घ्या
Image Credit source: ACC/Asian Cricket
| Updated on: Jan 24, 2026 | 8:56 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील 20 संघ आधीच ठरले होते. पण बांगलादेशने भारतात सामने खेळण्यास नकार दिल्याने स्कॉटलँडला संधी मिळाली. आता पाकिस्तानची नाटकं सुरु झाली आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. टी20 वर्ल्डकप खेळायचा की नाही अजून ठरलेलं नाही. पंतप्रधान पाकिस्तानात आल्यानंतर निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. पाकिस्तानने या स्पर्धेसाठी संघही जाहीर केलेला नाही. त्यामुळे स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक असताना पाकिस्तानने माघार घेतली तर काय? कोणत्या संघाला संधी मिळेल? याची उत्सुकता लागून आहे. स्कॉटलँडनंतर कोणता संघ लकी ठरू शकतो? ते सर्व जाणून घेऊयात.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानची जागा युगांडा हा संघ घेऊशकतो. कारण आयसीसी टी20 क्रमवारीत 21व्या स्थानावर आहे. 56 सामन्यात 142 गुण मिळवले आहेत. त्यामुळे रेटिंग 795 आहे. युगांडाने आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट सामन्यांमध्ये सातत्याने सुधारणा दाखवली आहे. पात्रता फेरीत प्रवेश न मिळवणाऱ्या परंतु चांगली कामगिरी करणाऱ्या संघांचा आयसीसी विचार करेल.युगांडाने यापूर्वी 2024 च्या टी20 विश्वचषकात भाग घेतला आहे. तसेच चार सामने खेळले आणि पीएनजी विरुद्ध एक सामना जिंकला. मात्र यंदाच्या टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पात्र ठरू शकला नाही. पण युगांडाने केलेल्या चांगल्या कामगिरीची दखल आयसीसी घेऊ शकते.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानचा संघ भारताच्या गटात आहे. या गटात भारत, नामिबिया, नेदरलँड, पाकिस्तान आणि अमेरिका हे संघ आहेत. या गटातून भारत आणि पाकिस्तान पुढच्या फेरीत जागा मिळवतील अशी स्थिती आहे. या गटातून पाकिस्तानने माघार घेतली तर पाकिस्तानची जागा युगांडाने घेईल. ठरलेल्या शेड्युल प्रमाणे पाकिस्तानचे सर्व सामने युगांडा खेळेल. हे सर्व सामने श्रीलंकेत होतील. इतकंच भारताचा युगांडाविरुद्धचा सामनाही श्रीलंकेत होईल. पण हे सर्व पाकिस्तानच्या निर्णयावर अवलंबून असेल. पाकिस्तानने माघार घेतल्यास युगांडाचा पर्याय आयसीसीकडे असेल.