IPL 2021 सुरु असतानाच सनरायजर्स हैद्राबाद संघात नवा खेळाडू दाखल, टी. नटराजनला कोरोनाची बाधा झाल्यामुळे बदल

सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन याला कोरोनाची बाधा झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. त्यानंतर सहा इतर सदस्यांना विलगीकरणातही ठेवण्यात आलं होतं.

IPL 2021 सुरु असतानाच सनरायजर्स हैद्राबाद संघात नवा खेळाडू दाखल, टी. नटराजनला कोरोनाची बाधा झाल्यामुळे बदल
सनरायजर्स हैद्राबादचा संघ
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 5:15 PM

मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे मे महिन्यात स्थगित झालेली इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2021) नुकतीच 19 सप्टेंबरपासून पुन्हा सुरु झाली आहे. पण सुरुवातीचे काही सामने होताच कोरोना महामारीने पुन्हा आयपीएलमध्ये शिरकाव केला सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे आधीच गुणतालिकेत सर्वात खाली असणाऱ्या हैद्राबादची संकट आणखी वाढली होती. त्यामुळे त्यांनी एका नव्या खेळाडूला संघात सामिल केलं आहे.

उम्रान मलिक (Umran Malik) असं या खेळाडूचं नाव असून तो टी नटराजनच्या जागी संघातून खेळणारा आहे. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.

टी नटराजन कोरोनाबाधित आढळताच हैद्राबाद संघातील सहा सदस्यांना विलगीकरणात ठेवण्यात आलं होतं. यामध्ये खेळाडू विजय शंकर याचाही समावेश होता. त्याच्यासह विजय कुमार (टीम मॅनेजर), श्याम सुंदर (फीजिओ), अंजना वन्नन (डॉक्टर), तुषार खेडकर (लॉजिस्टिक मॅनेजर), पीए. गणेशन (नेट बोलर) यांचा समावेश आहे. दरम्यान संघाच्या इतर सदस्यांची RT-PCR टेस्ट करण्यात आली होती. जी निगेटिव्ह आल्यानंतर दिल्लीसोबत हैद्राबादने सामना खेळला पण त्यातही त्यांना पराभव पत्करावा लागला. यामुळे हैद्राबादने यंदाच्या आय़पीएलमध्ये 8 पैकी केवळ एकच सामना जिंकला असून 7 सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे त्यांच्या बाद फेरीत जाण्याची शक्यता फारच कमी आहे.

हैद्राबाद संघाचे उर्वरीत सामने

– 25 सप्टेंबर (शनिवार): हैद्राबाद vs पंजाब किंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 27 सप्टेंबर (सोमवार): हैद्राबाद vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 30 सप्टेंबर (गुरुवार): हैद्राबाद vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 03 ऑक्टोबर (रविवार): हैद्राबाद vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 06 ऑक्टोबर (बुधवार): हैद्राबाद vs आरसीबी, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): हैद्राबाद vs मुंबई इंडियन्स, दुपारी 3:30 वाजता, अबू धाबी

हे ही वाचा

Hardik Pandya : मुंबईच्या दोन्ही सामन्यात संधी नाही, हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातूनही बाहेर पडणार?

IPL 2021: आधी गोलंदाजांनी जखडलं, मग अय्यर-त्रिपाठीने फोडलं, KKR चा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय

Eoin Morgan : मुंबईविरुद्ध सोपा विजय, तरीही कोलकाताच्या कर्णधाराला मोठा झटका

(Umran Malik joins SRH in middle of season as Replacement for T natrjan as he found to be Corona Positive)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.