AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: इंग्लंड पाठोपाठ ‘या’ देशाचे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळणार, मुंबईसह हैद्राबाद संघाला मोठा फायदा

आयपीएल 2021 मागील मे महिन्यात स्थगित झाली होती. आता उर्वरीत सामने 19 सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये होणार आहेत. यावेळी परदेशी खेळाडूंचा सहभाग ही बीसीसीआयसमोरील सर्वात मोठी समस्या आत हळूहळू नीट होताना दिसत आहे.

IPL 2021: इंग्लंड पाठोपाठ 'या' देशाचे खेळाडूही आयपीएलमध्ये खेळणार, मुंबईसह हैद्राबाद संघाला मोठा फायदा
मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
| Edited By: | Updated on: Aug 10, 2021 | 1:04 PM
Share

मुंबई : मागील वर्षी कोरोनाच्या शिरकावामुळे स्थगित झालेली आयपीएल 2021 (IPL 2021) आता युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. या आयोजना दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर (BCCI) परदेशी खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग ही सर्वात मोठी समस्या होती. ही समस्या आता हळूहळू नीट होत असून आधी इंग्लंड क्रिकेट बोर्डातील खेळाडूंना इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ECB) आयपीएलमध्ये खेळण्यास परवानगी दिली होती. त्यापाठोपाठ न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने देखील आपल्या खेळाडूंना आयपीएल खेळण्याची परवानगी दिली आहे. यामुळे मुंबई इंडियनस, सनरायझर्स हैद्राबाद या संघाना विशेष फायदा होणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेटने याबाबतची माहिती मंगळवारी (10 ऑगस्ट) दिली. बोर्डाचे मुख्य कार्यकारी डेविड वाइट यांनी खेळाडूंना आयपीएल खेळू देण्याची परवानगी देतानाच ‘‘ही आमची व्यावसायिक वागणूक असून आयपीएलबाबत आम्ही कायमच सकारात्मक आणि आपुलकीने विचार केला आहे.’’

न्यूझीलंडकडून टी-20 विश्वचषकासाछी संघ जाहीर

आगामी आयसीसी टी-20 विश्व विश्वचषकासाठी (ICC T20 World Cup 2021) न्यूझीलंड (New Zealand) क्रिकेट संघाने आपला संघ जाहीर केला आहे. केन विलियमसन (Kane Williamson) च्या नेतृत्त्वाखाली 16 सदस्यांचा संघ जाहीर करण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कपचं आयोजन 17 ऑक्टोबरपासून होणार आहे. मात्र न्यूझीलंड संघाने दोन महिन्यांपूर्वीच संघाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे संघातील सर्वात दिग्गज खेळाडू रॉस टेलरला यंदा विश्रांती देण्यात आली असून त्याचा समावेश केला गेलेला नाही. तसेच कोलिन डी ग्रँडहोम, टॉम लॅथम सारखी तगडी नावही दिसून येत नाहीत.

टी 20 विश्वचषकासाठी न्यूझीलंडचा संघ-

केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डेवन कॉन्वे, टिम साउदी, ट्रेंट बोल्ट, टिम सीफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, ईश सोढ़ी, ग्लेन फिलिप्स, जिम्मी नीशम, डेरिल मिचेल, काइल जेमिसन, लॉकी फर्ग्यूसन, मार्क चेपमॅन आणि टॉड एस्टल.

हे ही वाचा – 

IPL 2021 साठी नियमांमध्ये बदल, बीसीसीआयकडून नवी नियमावली जाहीर

IPL 2021: यूएईत 19 सप्टेंबरपासून घमासान, पहिल्या सामन्यात मुंबई VS चेन्नई भिडणार, पाहा संपूर्ण टाईमटेबल एका क्लिकवर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.