AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2023 : मागच्या सीजनपेक्षा जास्त घातक ठरेल ‘ही’ टीम, संजय मांजरेकरांची भविष्यवाणी

IPL 2023 News : संजय मांजरेकरांची ही भविष्यवाणी खरी ठरेल का? आता आयपीएलचा सीजन सुरु होत असताना, प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक आपआपली मत, निरीक्षण नोंदवतायत.

IPL 2023 : मागच्या सीजनपेक्षा जास्त घातक ठरेल 'ही' टीम, संजय मांजरेकरांची भविष्यवाणी
Sanjay manjrekarImage Credit source: twitter
| Updated on: Mar 31, 2023 | 3:31 PM
Share

Sanjay Manjrekar Statement : इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामाला आजपासून सुरुवात होत आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायन्टस हे दोन संघ आमने-सामने येणार आहेत. नरेंद्र मोदी स्टेडियमवर सलामीचा सामना होईल. चेन्नईच्या टीमने चारवेळा आयपीएलच विजेतेपद पटकावलं आहे. गुजरातच्या टीमने पदार्पणातच आयपीएलची ट्रॉफी जिंकून दाखवली. आता आयपीएलचा सीजन सुरु होत असताना, प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक आपआपली मत, निरीक्षण नोंदवतायत.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स एक फेव्हरेट संघ आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाचवेळा त्यांनी आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. पण मागच्यावर्षी नव्याने आलेले दोन संघ गुजरात टायटन्स आणि लखनौ सुपर जायंट्सने हम किसीसे कम नही, हे दाखवून दिलय.

संजय मांजरेकरांच्या मते ‘ही’ टीम जिंकू शकते

टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध क्रिकेट विश्लेषक संजय मांजरेकर यांनी, यंदाच्या सीजनमध्ये कोण विजेतेपद मिळवेल? त्या बद्दल आपलं मत नोंदवलय. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्सची टीम आयपीएल ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल, असा विश्वास संजय मांजरेकर यांनी व्यक्त केला आहे.

क्वालिफायर आणि अंतिम फेरीत एकाच टिमला हरवलं

आयपीएल 2022 मध्ये गुजरात टायटन्सची टीम 14 पैकी 10 सामने जिंकून पॉइंट्स टेबलमध्ये टॉपवर होती. त्यांचे 20 पॉइंट्स होते. प्लेऑफमध्ये गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला त्यानंतर अंतिम फेरीत त्याच टीमला सात विकेटने हरवलं होतं. आयपीएलच्या डेब्यु सीजनमध्येच विजेतेपदाला गवसणी घातली होती.

संजय मांजरेकर काय म्हणाले?

“आयपीएल 2022 च्या लिलावात गुजरात टायटन्सच प्रदर्शन काही खास नव्हतं. पण त्यांनी किताब जिंकला. त्यांनी अनेक मोठे निर्णय घेतले. हार्दिक पंड्याला कॅप्टन बनवणं. कोणालाही वाटलं नव्हतं की, हार्दिक पंड्या इतका शानदार कर्णधार असेल” असं संजय मांजरेकर म्हणाले.

चेन्नई सुपरकिंग्स टीम

एमएस धोनी (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अंबाती रायुडू, सुभ्रांशु सेनापति, मोईन अली, शिवम दूबे, राजवर्धन हंगरगेकर, ड्वेन प्रिटोरियस, मिचेल सेंटनर, रविंद्र जडेजा, तुषार देशपांडे, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, सिमरजीत सिंह, दीपक चहर, प्रशांत सोलंकी, महेश थिक्शाना, अजिंक्य रहाणे, बेन स्टोक्स, शेख रशीद, निशांत सिंधु, कायले जेमीन्सन, अजय मंडल आणि भगत वर्मा. गुजरात टायटन्स टीम

हार्दिक पांड्या (कॅप्टन), राशिद खान, राहुल तेवतिया, शुभमन गिल, मोहम्मद शमी, शिवम मावी, जोशुआ लिटिल, यश दयाल, डेविड मिलर, आर साई किशोर, अभिनव सदरंगानी, अल्जारी जोसेफ, मैथ्यू वेड, केन विलियमसन, रिद्धिमान साहा, जयंत यादव, विजय शंकर, केएस भरत, ओडियन स्मिथ, मोहित शर्मा, नूर अहमद, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, दर्शन नालकंडे आणि साईं सुदर्शन.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.