Vaibhav Sooryavanshi: टेनिस कोर्टवर वैभवने केलेली ‘ती’ एक भविष्यवाणी ठरली खरी, Wimbledon Final 2026 मधील Video Viral

काल विम्बल्डन फायनल 2026 सामना पार पाडला. हा सामना पाहण्यासाठी अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, तसेच क्रिकेटमधीलही वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि माजी दिग्गज क्रिकेटपटू युवराज सिंग उपस्थित होते. आता या सामन्यापूर्वी वैभवने केलेली एक भविष्यवाणी खरी ठरली.

Vaibhav Sooryavanshi: टेनिस कोर्टवर वैभवने केलेली ती एक भविष्यवाणी ठरली खरी, Wimbledon Final 2026 मधील Video Viral
vaibhav sooryavanshi
| Updated on: Jul 13, 2026 | 8:54 AM

यानिक सिनरने विम्बल्डन 2026 च्या अंतिम सामन्यात अलेक्झांडर झ्वेरेव्हचा पराभव करून आपले सलग दुसरे विजेतेपद पटकावले. सेंटर कोर्टवर खेळला गेलेला हा सामना पाहण्यासाठी अनेद देसातून अनेक क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. कालचा फायनल सामना पाहण्यासाठी क्रिकेट संघाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा हे देखील उपस्थित होता. नुकतीच इंग्लंडविरुद्ध टी-20 मालिका संपली आहे. यामुळे खेळाडू आता टोनिस कोर्टावर हजर दिसले. यात वैभवने एक भविष्यवाणी केली होती जी तंतोतंत खरी ठरली. ज्याचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल होत आहे.

सामन्यादरम्यान, वैभवने टेनिसशी असलेले त्याचे नाते आणि त्याच्या आवडत्या खेळाडूंबद्दल काही रंजक गोष्टी सांगितल्या. जिओस्टारशी बोलताना वैभव म्हणाला की, “मी गेल्या चार-पाच वर्षांपासून नियमितपणे टेनिस पाहत आहे. या काळात मी राफेल नादाल आणि नोव्हाक जोकोविच या दोघांच्याही खेळाचे बारकाईने निरीक्षण केले आहे, पण जोकोविच माझा आवडता खेळाडू आहे.”

सध्याच्या खेळाडूंबद्दल बोलताना, वैभवने कार्लोस अल्काराझचे कौतुक केले, पण यावेळी आपला विश्वास यानिक सिनरवर असल्याचेही सांगितले. अंतिम सामन्यापूर्वीच त्याने सिनर ट्रॉफी जिंकेल अशी आशा व्यक्त केली होती आणि अखेरीस त्याचा अंदाज खरा ठरला. सिनरने अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत अलेक्झांडर झ्वेरेव्हला 6-7(7), 7-6, 6-3, 6-4 असे हरवून सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन चॅम्पियन बनण्याचा मान मिळवला.

जेव्हा वैभवला विचारण्यात आले की, जर तो टेनिस दुहेरी खेळला तर कोणासोबत भागीदारी करेल, तेव्हा त्याने लगेच अभिषेक शर्माचे नाव घेतले. वैभव म्हणाला की, “मला क्रिकेटमधील आमची सलामी भागीदारी खूप आवडते आणि त्यांच्यासोबत फलंदाजी करताना मला नेहमीच मजा येते. म्हणूनच मला टेनिस कोर्टवरही अभिषेक शर्माला जोडीदार म्हणून निवडायला आवडेल.” वैभव सूर्यवंशी, अभिषेक शर्मा आणि माजी दिग्ग्ज क्रिकेटपटू युवराज सिंग यांनी या फायनल सामन्यात हजेरी लावली होती. यांचे व्हिडिओ सोशलमीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले दिसले.

Follow Us