AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत वैभव सूर्यवंशीने करावी ओपनिंग, दिग्गज खेळाडूने असं सांगितलं कारण…

भारत आणि झिम्बाब्वे मालिका नुकतीच पार पडली. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने झिम्बाब्वेला 3-0 ने मात दिली. आता वनडे क्रिकेटमध्ये टीम इंडियाची सुधारण्यासाठी माजी क्रिकेटपटूने एक सल्ला दिला आहे. शुबमन गिलच्या जागी वैभव सूर्यवंशीने ओपनिंग करावी, असं सांगितलं आहे. असं का ते समजून घ्या.

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत वैभव सूर्यवंशीने करावी ओपनिंग, दिग्गज खेळाडूने असं सांगितलं कारण...
वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्मासोबत वैभव सूर्यवंशीने करावी ओपनिंग, दिग्गज खेळाडूने असं सांगितलं कारण...Image Credit source: PTI
| Updated on: Jul 27, 2026 | 3:01 PM
Share

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत वैभव सूर्यवंशीची बॅट शांत होती. मात्र झिम्बाब्वे मालिकेत त्याने पूर्ण वसुली केली. त्याने या मालिकेत सर्वाधिक 151 धावा केल्या. त्यामुळे वैभव आता टी20 फॉर्मेटमध्ये फिट बसल्याचं बोललं जात आहे. आता वनडे फॉर्मेटमध्येही त्याला संधी देण्याची मागणी जोर धरत आहे. माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांच्या मते, शुबमन गिलच्या जागी वैभव सूर्यवंशीने रोहित शर्मासोबत ओपनिंग करायला हवी. तर कर्णधार शुबमन गिलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. फारूख इंजिनियर यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण शुबमन गिल ओपनर आहे आणि त्याचा वैभवने घ्यावी, असं कसं होऊ शकतं? चला जाणून घेऊयात त्यांनी असं का सांगितलं ते..

वैभव सूर्यवंशीबाबत फारुख इंजिनियर काय म्हणाले?

माजी क्रिकेटपटू फारूख इंजिनियर यांनी वैभव सूर्यवंशीची फलंदाजी पाहून त्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. त्यांच्या मते वनडेत ओपनर म्हणून उतरला तर गिलपेक्षा चांगले गॅप्स शोधू शकतो. कारण तो बहुतांश शॉट्स हे हवेत खेळतो. फारूख इंजिनियर म्हणाले की, ‘शुबमन गिल हवेत फटकेबाजी करणारा फलंदाज नाही. वनडेत उजवं आणि डावं ओपनिंग कॉम्बिनेशन चांगलं करण्यासाठी वैभव चांगला पर्याय आहे. रोहित शर्मा खेळत असले तर त्याच्यासोबत वैभव सूर्यवंशीने ओपनिंग करायला हवी. वैभव सूर्यवंशी हा ओपनिंगसाठी चांगला पर्याय असेल. कारण तो मैदानात सर्वाधिक गॅप शोधू शकतो. विराट कोहली तिसर्‍या क्रमांकावर खेळेल. तर गिलला चौथ्या क्रमांकावर उतरलं पाहिजे. त्यामुळे आपली बॅटिंग लाइनअप चांगली होईल.’

गिलची जागा घेणं सोपं नाही

फारूख इंजिनियर यांनी आपलं मत मांडलं असलं तरी आकडेवारी गिलच्या बाजूने आहे. या फॉर्मेटमध्ये शुबमन गिलने सर्वांची तोंड बंद केली आहेत. गिलने वनडेत 60हून अधिकच्या सरासरीने धावा केलया आहे. वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे. त्याने 66 वनडे सामन्यात 60.3 च्या सरासरीने 3379 धावा केल्या आहेत. त्याच्या स्ट्राईक रेट 100हून अधिक आहे. त्याने वनडेत 9 शतकं आणि 20 अर्धशतकं ठोकली आहेत. त्यामुळे आकडेवारी पाहता गिलची जागा घेणं कठीण आहे. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीला या फॉर्मेटमध्ये लगेच संधी मिळणं कठीण आहे. सूर्यवंशीने आता कुठे टी20 फॉर्मेटमध्ये 6 सामने खेळले आहेत. त्यामुळे भविष्यात त्याची कामगिरी चांगली राहिली नक्कीच विचार होईल. पण 2027 वनडे वर्ल्डकपपूर्वी ते शक्य नाही.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार