AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियासाठी खेळणं कठीण! आयसीसीच्या या नियमामुळे मोठा धक्का

14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावलौकिक मिळवल्यानंतर आयपीएलमध्येही झेंडा रोवला आहे. त्याच्या खेळीमुळे प्रत्येक जण आवाक् आहेत. त्यामुळे लवकरच त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं खुली होतील असं वाटत आहे. पण आयसीसीच्या नियमामुळे सध्या टीम इंडियात एन्ट्री करणं कठीण आहे.

वैभव सूर्यवंशीचं टीम इंडियासाठी खेळणं कठीण! आयसीसीच्या या नियमामुळे मोठा धक्का
वैभव सूर्यवंशीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 29, 2025 | 9:59 PM
Share

आयपीएल 2025 स्पर्धेत वैभव सूर्यवंशी हा सर्वात चर्चित चेहरा आहे. वैभव सूर्यवंशी कमी वयात आणि क्रिकेटमध्ये अल्पावधीतच नावलौकिक मिळवला आहे. फक्त 14 वय असताना आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांना सामोरं गेला. इतकंच काय तर निर्भयपणे त्यांना फटकावलंही. अवघ्या 35 चेंडूत शतक ठोकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे क्रीडारसिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोवळ्या वयात इतकी मोठी कामगिरी करणं म्हणजे खरंच काही तरी दैवी शक्ति पाठीशी असावी असं क्रीडाप्रेमी म्हणत आहेत. वैभवचा निर्भय खेळ पाहून लवकरच त्याच्यासाठी टीम इंडियाची दारं खुली होतील असं वाटत आहे. अनेकांनी तर याच वर्षी त्याचं पदार्पण होईल असंही भाकीत केलं आहे. पण आयसीसीच्या एका नियमामुळे तसं होणं जरा कठीण आहे.

वैभव सूर्यवंशीच्या करिअरमध्ये आयसीसीच्या नियमाचा खोडा

आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी अनेक नियम तयार केले आहेत. यात एक नियम वयाशी संदर्भात आहे. त्यामुळे वैभवला टीम इंडियात जागा मिळवण्यासाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. आयसीसीने वर्ष 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वयाची मर्यादा आखून दिली आहे. या नियमानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भाग कमीत कमी वय हे 15 वर्षे असणं आवश्यक आहे. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशी हा फक्त 14 वर्षांचा आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच 27 मार्च 2026 रोजी तो 15 वर्षांचा होईल. तेव्हा त्याला कुठे खेळण्याची संधी मिळेल. यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी वयाची अट नव्हती. पाकिस्तानकडून हसन रजाने फक्त 14 वर्षे आणि 227 दिवसांचा असताना कसोटीत पदार्पण केलं होतं. आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे.

बीसीसीआयने आयसीसीकडे मागणी केल्यास शक्य!

आयसीसीच्या नियमात एक पळवाट आहे. वैभव सूर्यवंशी 15 वयापेक्षा कमी असताना टीम इंडियासाठी खेळू शकतो. पण यासाठी बीसीसीआयला आयसीसीकडे साकडं घालावं लागेल. अपवादात्मक परिस्थितीत क्रिकेट बोर्ड 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या खेळाडूला त्यांच्याकडून खेळण्याची परवानगी देण्यासाठी आयसीसीकडे अर्ज करू शकते. आयसीसी खेळाडूचा खेळण्याचा अनुभव, मानसिक विकास आणि आरोग्य पाहते, त्यानुसार खेळायचे की नाही याबाबत निकाल देते. जर आयसीसीने परवानगी दिली तर कोणताही खेळाडू 15 वर्षांच्या आधी टीम इंडियाकडून खेळू शकतो.

टीम इंडियाकडून सर्वात कमी वयात खेळणारा खेळाडू हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने 16 वर्षे आणि 205 दिवसांचा असताना भारतासाठी पहिला कसोटी सामना खेळला होता. लगेचच पहिला एकदिवसीय सामनाही खेळला. जर वैभव सूर्यवंशीला खेळण्याची संधी मिळाली तर हा विक्रम मोडू शकतो.

Follow Us
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
आदित्य ठाकरे यांचा शिंदे गटावर हल्लाबोल; 'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही'
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल; ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार
मोदी-शाह संपले; काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान
काँग्रेस बैठकीत राहुल गांधींचे मोठे विधान; 'मोदी-शाह संपले'
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप
मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस आणि शिंदेंवर गंभीर आरोप; मुंबईकडे कूच करण्याचा इशारा
कंगनाने वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट
कंगना रणौतची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वर्षा निवासस्थानी भेट
साठ्ये महाविद्यालयाबाहेर मनविसे-एबीविपी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची
मुंबईतील साठ्ये कॉलेजमध्ये नोंदणी मोहिमेवरून मनविसे आणि एबीविपीत वाद
भारताचा पाकिस्तानवर ५-३ असा दणदणीत विजय
भारताने पाकिस्तानला हरवून हॉकी वर्ल्डकपच्या नॉकआउटमध्ये स्थान मिळवले
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या; पोलिसांकडे तक्रार
राहुल गांधींच्या भेटीनंतर रिया अहिरला धमक्या: युवक काँग्रेसची पोलिसांकडे तक्रार
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर,
केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार की नाही? ओमराजेंनी हसत दिलं उत्तर, काय म्हणाले?