28 चेंडूंत शतक, 52 चेंडूंत द्विशतक अन्… वैभव सूर्यवंशीने क्रिकेटचे सगळे हिशेबच बदलले; एकाच खेळीत किती विक्रम मोडले?

Vaibhav Suryavanshi Innings Leaves Cricket World: युएईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित 50 षटकांत आठ गडी गमावून 249 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंडिया 'अ' संघाने केवळ तीन गडी गमावून 14.2 षटकांत 214 चेंडू लवकर लक्ष्य गाठले.

28 चेंडूंत शतक, 52 चेंडूंत द्विशतक अन्... वैभव सूर्यवंशीने क्रिकेटचे सगळे हिशेबच बदलले; एकाच खेळीत किती विक्रम मोडले?
Vaibhav Suryavanshi Rewrites Cricket History With a Flurry of Records
| Updated on: Nov 24, 2026 | 10:17 PM

छोटा बच्चा जानके हमको ना समझाना रे… हे गाणं आठवतंय का? आठवत असेल तर विसरून जा, कारण आता वेळ आहे ॲक्शनची गाण्यांची नाही. ही वेळ आणली आहे एका 15 वर्षांच्या मुलाने. हो तोच! आपला वैभव. भारतीय क्रिकेटचा पुढचा सूर्यवंशी.. कतारमध्ये सुरू असलेल्या एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये त्याने युएईविरुद्ध इंडिया ‘ए’ संघाकडून खेळताना 53 चेंडूंमध्ये 204 धावा केल्या.

जर तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसत नसेल, तर पुन्हा वाचा. 54 चेंडूंमध्ये 204 धावा. अवघ्या 28 चेंडूंमध्ये शतक झळकावून त्याने लिस्ट-ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतकाचा विश्वविक्रम केला. वैभव सूर्यवंशीने एक-दोन नव्हे, तर तब्बल 28 षटकार आणि सात चौकार ठोकले. मैदानावर असा एकही कोपरा नव्हता जिथे वैभवचे षटकार पोहोचले नाहीत. केवळ चौकार आणि षटकारांमधून 196 धावा म्हणजेच 384.90 चा थरारक स्ट्राईक रेट.

Loading...

हे खरं आहे की मैदान लहान होतं. समोरचे गोलंदाज अननुभवी होते, पण द्विशतक झळकावणे ही काही साधी गोष्ट नाही. धावा करण्यासाठी फटकेबाजी करावी लागते. धैर्याने फटके मारावे लागतात. वैभवने गेल्या दोन सामन्यांतील सर्व वेदना आजच काढून टाकल्या. आता नेपाळ आणि पाकिस्तानविरुद्ध लवकर बाद झाल्याबद्दल त्याच्या मनात कोणतीही खंत राहणार नाही. वैभव सूर्यवंशीने 28 चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले, ज्यामध्ये त्याने 14 षटकार मारून लिस्ट ए क्रिकेटमधील एक विश्वविक्रम प्रस्थापित केला.

त्याने अवघ्या 40 चेंडूंमध्ये 150 धावा पूर्ण केल्या, जो लिस्ट ए क्रिकेटमधील आणखी एक विश्वविक्रम आहे. सूर्यवंशीने 52 चेंडूंमध्ये आपले द्विशतक पूर्ण केले आणि वरिष्ठ व्यावसायिक क्रिकेटमध्ये असे करणारा तो सर्वात वेगवान फलंदाज ठरला. सूर्यवंशीने आपल्या खेळीत एकूण 28 षटकार मारले, जो व्यावसायिक क्रिकेटमध्ये एकाच डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा जागतिक विक्रम आहे. या युवा फलंदाजाने लिस्ट ए क्रिकेटमधील सर्वात जलद शतक झळकावून इतिहास रचला. त्याने हा पराक्रम अवघ्या 28 चेंडूंमध्ये केला.

भारताच्या सात धावांच्या दणदणीत विजयानंतर सामनावीर ठरलेल्या वैभव सूर्यवंशीने आपली ऐतिहासिक कामगिरी करूनही फारसा जल्लोष न करण्याचे ठरवले. मागच्या दोन सामन्यांमध्ये स्थिरावल्यानंतर मी बाद झालो. आज, जेव्हा मी फलंदाजीला आलो, तेव्हा मला जाणवले की गोलंदाजांना फारशी मदत मिळत नाहीये, त्यामुळे मी स्वतःवर विश्वास ठेवला. डाव पुढे नेण्याची माझी योजना होती. आज ती यशस्वी झाली.

बिहार संघाचे कर्णधारपद भूषवताना खूप मजा आली आणि संघ चांगला खेळत आहे. मी या संघातील वरिष्ठ खेळाडूंसोबत खेळलो आहे आणि त्यांच्यासोबत असणे हा एक उत्तम अनुभव होता. आम्ही सध्या फारसा जल्लोष करणार नाही, कारण आम्हाला उपांत्य फेरी जिंकून अंतिम सामन्यातही आमची कामगिरी कायम ठेवण्याची आशा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us