VHT 2025 : रोहित शर्मा खेळत असलेल्या सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला थेट रुग्णालयात दाखल केलं

विजय हजारे ट्रॉफी 2025-26 स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळत आहेत. मुंबईचा दुसरा सामना उत्तराखंडशी झाला. या सामन्यात एक अपघात घडला.

VHT 2025 : रोहित शर्मा खेळत असलेल्या सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला थेट रुग्णालयात दाखल केलं
रोहित शर्मा खेळत असलेल्या सामन्यात मोठा अपघात, खेळाडूला थेट रुग्णालयात दाखल केलं
Image Credit source: PTI
| Updated on: Dec 26, 2025 | 6:03 PM

विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत वनडे सामन्यांचा थरार सुरु आहे. दिग्गज खेळाडू मैदानात उतरले असून सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये मुंबई आणि उत्तराखंड यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईने उत्तराखंडला 51 धावांनी पराभूत केलं. पण या सामन्यात एक अपघात घडला आणि खेळाडूंच्या काळजाचा ठोका चुकला. रोहित शर्माचा सलमीचा जोडीदार अंगकृष रघुवंशी गंभीररित्या जखमी झाला. त्याची दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला स्वत:च्या पायावर उभंही राहता येत नव्हतं. त्यामुळे त्याला मैदानातून स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आलं. त्याच्या वेदना पाहून त्याला त्यानंतर थेट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. झेल पकडताना अंगकृषला ही दुखापत झाली. झेलसाठी त्याने उडी मारली, पण त्याचा डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापत झाली.

अंगकृष रघुवंशीला उत्तराखंड फलंदाजी करत असलेल्या 30व्या षटकात दुखापत झाली. सौरभ रावते फिरकीपटू तनुष कोटियनच्या गोलंदाजीवर स्लॉग स्वीप शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या टोकाला लागला आणि डीप मिडविकेटच्या दिशेने गेला. रघुवंशी झेल घेण्यासाठी धावला आणि एका हाताने झेल पकडण्याच प्रयत्न केला. पण असं करताना त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला आणि मानेला दुखापत झाली. अंगकृष पडल्यानंतर उभा राहिला पण अचानक पडला. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवर नेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्याला रुग्णालयात दाखल केलं असून सीटी स्कॅन करण्यात आलं आहे. तसेच त्याला देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, अंगकृषला दुखापत झाली तेव्हा रुग्णावाहिका येण्यास बराच विलंब झाला.

विजय हजारे ट्रॉफीत मुंबईने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 331 धावा केल्या. तसेच विजयासाठी 332 धावांचं आव्हान दिलं. या धावांचा पाठलाग करताना उत्तराखंडचा संघ 50 षटकात 9 गडी गमवून 280 धावा करू शकला. हा सामना मुंबईने 51 धावांनी गमावला. या सामन्यात अंगकृष फलंदाजीत फार काही ग्रेट करू शकला नाही. त्याने 20 चेंडूत 1 चौकार मारत 11 धावा केल्या. अंगकृष मुंबईचा प्रतिभावंत तरूण फलंदाज आहे. 21 वर्षीय अंगकृषने मुंबईसाठी चार प्रथम श्रेणी सामने, 12 लिस्ट ए आणि 37 टी20 सामने खेळले आहेत. आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतो आणि 18 डावात 29 च्या सरासरीने आणि 144.68 च्या स्ट्राईक रेटने 463 धावा केल्यात.