
विजय हजारे ट्रॉफी 2025 स्पर्धेत बदोडा आणि विदर्भ हे संघा आमनेसामने आले. या सामन्यात नाणेफेकीचा कौल विदर्भाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बरोड्याची सुरुवात काही चांगली झाली नाही. 71 धावांवर 5 गडी तंबूत परतले होते. त्यानंतर सातव्या क्रमांकावर फलंदाजी हार्दिक पांड्या उतरला. त्याने सहाव्या विकेटसाठी भाऊ कृणाल पांड्यासोबत 65 धावांची भागीदारी केली. तसेच झंझावात सुरुच ठेवला. जो समोर गोलंदाज येईल त्याला अक्षरश:फोडून काढलं. हार्दिक पांड्याने 92 चेंडूत 133 धावांची खेळी केली. यात त्याने 11 षटकार आणि 8 चौकार मारले. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट हा 144.57 चा होता. या खेळीसह त्याने आपला फॉर्म काय आहे ते दाखवून दिलं आहे. त्यामुळे टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत हार्दिक पांड्या कमाल करेल असं दिसत आहे. विशेष म्हणजे बडोद्यासाठी खेळताना त्याने 68 चेंडूतच शतक पूर्ण केलं. त्याच्या या खेळीमुळे बडोद्याला 50 षटकात 9 गडी गमवून 293 धावांपर्यंत मजल मारता आली.
विजय हजारे ट्रॉफीतील या सामन्यात हार्दिक पांड्या फलंदाजीला आला तेव्हा बडोदा संघाची स्थिती नाजूक होती. पण हार्दिक पांड्या सहजासहजी हार मानणारा नाही. त्याने विदर्भाच्या गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले. विदर्भाचा गोलंदाज पीआर रेखाडेला आजचा दिवस काही चांगला गेला नाही. हार्दिक पांड्याच्या रडारवर रेखाडे आला आणि एकाच षटकात 34 धावा काढल्या. यावेळी त्याने 5 षटकार आणि 1 चौकार मारला. विदर्भासाठी 39वं षटकं खूपच महागडं पडलं. हार्दिक पांड्या हे षटक खेळण्यापूर्वी 62 चेंडूत 66 धावा करून खेळत होता. पण हे षटक संपता संपता त्याने शतक पूर्ण केलं.
6,6,6,6,6,4 BY HARDIK PANDYA TO BRING HIS FIRST HUNDRED IN LIST A CRICKET…!!! 🥶
– The Madman of Indian Cricket. pic.twitter.com/7ib5UFTOMR
— Johns. (@CricCrazyJohns) January 3, 2026
हार्दिक पांड्याने लिस्ट ए वनडे करिअरमध्ये पहिल्यांदाच शतक ठोकलं आहे. त्याने 68 चेंडूत शतक पूर्ण केलं. पण त्यानंतरही त्याचा झंझावात काही थांबला नाही. त्याने विदर्भाच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. हार्दिकने 92 चेंडूत 133 धावांची खेळी केली. यापूर्वी हार्दिक पांड्याने लिस्ट एमध्ये नाबाद 92 धावांची खेळी केली होती. मात्र आता त्याने 130च्या पार धावा केल्या आहेत.