AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranji Trophy मध्ये एका मोठ्या टीमला फक्त 73 धावांच टार्गेट झेपलं नाही, विदर्भाच्या बॉलर्सची कमाल

Ranji Trophy मधील धक्कादायक निकाल, जिंकायचा सामना या टीमने हरला. रणजी ट्रॉफी स्पर्धेत एक नवीन रेकॉर्ड झालाय. दुसऱ्या इनिंगमध्ये या बॉलरने 6 विकेट काढल्या. काही खेळाडू पुनरागमनसाठी जोरदार प्रदर्शन करतायत. शतक-द्विशतक झळकावत आहेत.

Ranji Trophy मध्ये एका मोठ्या टीमला फक्त 73 धावांच टार्गेट झेपलं नाही, विदर्भाच्या बॉलर्सची कमाल
Cricket match
| Updated on: Jan 20, 2023 | 12:14 PM
Share

नागपूर – देशात सध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. अनेक गुणवान युवा खेळाडू रणजीमध्ये आपल्या खेळाने छाप उमटवत आहेत. टीम इंडियाच्या बाहेर गेलेले काही खेळाडू पुनरागमनसाठी जोरदार प्रदर्शन करतायत. शतक-द्विशतक झळकावत आहेत. पण त्याचवेळी या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत काही धक्कादायक निकालांची नोंद होत आहे. रणजी ट्रॉफीच्या एका सामन्यात फक्त 73 धावांच लक्ष्य एका टीमला झेपलं नाही. खरंतर 73 रन्स हे खूप सोपं टार्गेट आहे. पण विदर्भ विरुद्ध गुजरात सामन्यात 73 रन्स हे कठीण टार्गेट बनलं. विदर्भाच्या टीमने गुजरातला 18 धावांनी हरवलं.

रणजी ट्रॉफीत एक नवीन रेकॉर्ड

विदर्भाने गुजरातला विजयासाठी फक्त 73 रन्सच टार्गेट दिलं होतं. पण गुजरातची टीम फक्त 54 धावात ऑलआऊट झाली. जामथा येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात गुजरातचा फक्त एक फलंदाज दोन आकडी धावा करु शकला. स्पिनर आदित्य सरवटे विदर्भाच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने पहिल्या इनिंगमध्ये पाच विकेट घेतल्या. दुसऱ्या इनिंगमध्ये या बॉलरने 6 विकेट काढल्या. विदर्भने गुजरातवर हा विजय मिळवून रणजी ट्रॉफीत एक नवीन रेकॉर्ड रचलाय.

‘या’ टीम्सनी कमी धावांचा यशस्वी बचाव केला

विदर्भाची टीम रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात कमी धावांचा बचाव करणारी टीम बनली आहे. याआधी हा रेकॉर्ड 78 रन्सचा होता. 1949 साली बिहारच्या टीमने दिल्ली विरुद्ध 78 धावांच्या लक्ष्याचा बचाव केला होता. 2017 साली रेल्वेने उत्तर प्रदेश विरुद्ध 94 धावांच्या टार्गेटचा बचाव केला होता.

विदर्भाचा चत्मकारीक विजय

विदर्भाची टीम मॅचच्या पहिल्यादिवशी पराभवाच्या उंबरठ्यावर होती. विदर्भाने पहिल्या डावात फक्त 74 धावा केल्या होत्या. गुजरातने पहिल्या इनिंगमध्ये 256 धावा केल्या. म्हणजे गुजरातला विदर्भावर 172 धावांची मोठी आघाडी मिळाली होती.

त्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता

विदर्भाच्या फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्येही विशेष कमाल केली नाही. दुसऱ्या इनिंगमध्ये विदर्भाचा डाव 254 धावांवर संपुष्टात आला. गुजरातसमोर विजयासाठी फक्त 73 धावांच लक्ष्य होतं. हे खूपच सोपं टार्गेट होतं. पण यानंतर जे घडलं, त्याबद्दल कोणीच विचार केला नव्हता. गुजरातच सरेंडर

गुजरातने दुसऱ्या डावात पहिला विकेट पहिल्याच ओव्हरमध्ये गमावला. त्यानंतर जणू विकेटची रांगच लागली. सरवटे आणि हर्ष दुबेने वाट लावून टाकली. गुजरातचे 5 फलंदाज अवघ्या 34 धावात तंबुत परतले. गुजरातच्या लोअर ऑर्डरला हा दबाव पेलवला नाही. 54 धावात गुजराची टीम ऑलआऊट झाली.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.