T20 World Cup: न्यूझीलंडविरुद्ध बॅटिंग ऑर्डरमधील विराटची एक चूक पडली महागात, भारताच्या पराभवामागील कारणही हेच?

सध्या सुरु असलेला टी20 विश्वचषक (T20 World Cup) भारतासाठी अतिशय निराशाजनक सुरु आहे. सलग दुसऱ्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवलं.

T20 World Cup: न्यूझीलंडविरुद्ध बॅटिंग ऑर्डरमधील विराटची एक चूक पडली महागात, भारताच्या पराभवामागील कारणही हेच?
भारतीय क्रिकेट संघ

T20 World Cup 2021 : यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup) भारताची पराभवाची मालिका सुरुच आहे. आधी पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता न्यूझीलंडने 8 विकेट्सनी नमवलं आहे. सलगच्या दुसऱ्या पराभवानंतर सर्वच स्तरातून भारतीय क्रिकेट संघावर टीका होत आहेत. टीकांसह भारतीय संघाचं नेमकं काय चूकलं? यावरही अनेकजण आपलं मत देत आहे. अशावेळी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याने बॅटिंग ऑर्डरमध्ये केलेला बदल याला कारणीभूत असल्याचीही टीका होत आहे.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात (India vs New Zealand) सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे संघाबाहेर होता. त्यामुळे त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्यात आली. पण विराटने इशानला संधी देत त्याला सलामीला पाठवलं. त्यामुळे केवळ 3 आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असलेला इशान न्यूझीलंडच्या दिग्गज बोलिंग अटॅकसमोर केवळ 4 धावा करुन बाद झाला. ज्यानंतर आलेला रोहितही  14 बॉलमध्ये 14 रन काढून बाद झाला. कारण बहुतांश सलामीला खेळण्याचा अनुभव असणारा रोहित तिसऱ्या स्थानावर येऊन खास कामगिरी करणं अवघडचं होतं. रोहितने 113 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांपैकी 80 मॅचमध्ये ओपनिंग केली आहे. त्यामध्ये त्यानं 2 हजार 404 धावांसह 4 शतकही ठोकली आहेत. त्यामुळे रोहितला अशाप्रकारे तिसऱ्या स्थानावर पाठवण्याचा विराटचा निर्णय़ कुठेतरी चूकला. ज्यामुळे पुढील फलंदाजही दबाखाली खास कामगिरी करु शकले नाहीत आणि भारताचा खेळ 110 धावांवर आटोपला.

सामन्याचा लेखा-जोखा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली त्यामुळे यंदाच्या विश्वचषकात जिंकणारा संघ निवडत असल्याप्रमाणे गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यावेळी सूर्यकुमारच्या जागी इशान संघात असल्याने सलामीला राहुलसोबत तो आला. पण तो अवघ्या 4 धावा करुन बाद झाला. त्यानंतर मात्र एक-एक करत सर्व फलंदाज तंबूत परतले. संपूर्ण सामन्यात भारताकडून सर्वाधिक धावा हार्दीक पंड्या (23) आणि रवींद्र जाडेजा (नाबाद 26) यांनीच केल्या. ज्यामुळे भारताचा संपूर्ण डाव अवघ्या 110 धावांवर आटोपला.

यानंतर अवघ्या 111 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या न्यूझीलंडने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी दाखवली. सलामीवीर मार्टीन गप्टीलने 3 चौकार लगावत 20 धावा केल्या. चौथ्या षटकात बुमराहने त्याची विकेट घेतली. ज्यावेळी भारताच्या आशा काहीशा पल्लवीत झाल्या. पण त्यानंतर दुसरा सलमीवीर मिचेलने कर्णधार केनच्या मदतीने धडाकेबाज फलंदाजी केली. मिचेलने 35 चेंडूत 49 धावा केल्या. तर केनने 31 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेने 2 धावांची मदत करत संघाला विजय मिळवून दिला. संपूर्ण सामन्यात बुमराह सोडता भारताच्या गोलंदाजाना खास कामगिरी करता न आल्याने न्यूझीलंडचा संघ 8 विकेट्सनी विजयी झाला.

इतर बातम्या

T20 World Cup 2021: एखादा चमत्कारच भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो, शाहीद आफ्रिदीची कोपरखळी

न्यूझीलंडकडून पराभवानंतर शोएब अख्तरनंही टीम इंडियाला सुनवलं, म्हणतो ‘मैदानावर क्रिकेट खेळणार की इन्स्टाग्रामवर?’

IND vs NZ: अश्विनला Playing XI मध्ये स्थान न देणाऱ्या कोहलीचा बुमराहकडून बचाव, सांगितलं संधी न देण्याचं कारण

(Virat change in batting order for new zealand match impact alot and let india loss the game says expert)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI