Virat Kohali : विराट कोहलीची कसून तयारी, हँगकाँगविरुद्ध जिंकण्यासाठी करतोय मेहनत

कोहलीला फलंदाजीची संधी मिळाल्यास तो कागदावर कमकुवत हाँगकाँग संघाविरुद्ध शतकांचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. विराट कोहलीचे हे खास फोटो प्रचंड व्हायरल देखील होतायतय. वाचा...

Virat Kohali : विराट कोहलीची कसून तयारी, हँगकाँगविरुद्ध जिंकण्यासाठी करतोय मेहनत
हँगकाँगविरुद्ध जिंकण्यासाठी करतोय मेहनतImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 30, 2022 | 7:51 PM

नवी दिल्ली : विराट कोहली  याने (Virat Kohali) आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) पाकिस्तानविरुद्धच्या (IND vs PAK) सामन्यात संथ पण शानदार खेळी केली. त्यानं 35 धावा केल्या होत्या. मात्र, या सामन्यात त्याने काही शानदार फटकेही मारले. लोकांना वाटत होते की कोहली हा सामना स्वबळावर जिंकेल. मात्र, तसे झाले नाही आणि कोहलीने खराब शॉटवर आपली विकेट गमावली. आता बुधवारी भारतीय संघ हाँगकाँगशी भिडणार आहे. या सामन्यात विराट आपल्या फलंदाजीचे पराक्रम दाखवण्यात कोणतीही कसर सोडत नाही. मंगळवारी त्याने जिममध्ये घाम गाळतानाचे फोटो शेअर केले. कोहलीला फलंदाजीची संधी मिळाल्यास तो कागदावर कमकुवत हाँगकाँग संघाविरुद्ध शतकांचा दुष्काळ संपवू शकेल, अशी आशा चाहत्यांना आहे. विराट कोहलीचे हे खास फोटो प्रचंड व्हायरल देखील होतायतय.

हे ट्विट पाहा

शतकाची प्रतीक्षा

  • नोव्हेंबर 2019 पासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेलं नाही
  • विराटचे शेवटचे शतक नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध होते
  • विराटनं 136 धावांची खेळी खेळली
  • कोहलीने कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 अशा 69 सामन्यांच्या 80 डावांमध्ये 35.46 च्या सरासरीने 2589 धावा केल्या आहेत.
  • कोहलीनं 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
  • 1 डिसेंबर 2019 पासून तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तो सातव्या क्रमांकावर आहे.
  • कोहलीची  सर्वोच्च धावसंख्या 94 धावा आहे, जी त्याने फक्त टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये केली आहे.
  • विराटचे T20 मध्ये एकही शतक नाही. अशा परिस्थितीत तो हाँगकाँगविरुद्धही हा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

ब्रेकनंतर आशा

जवळपास महिनाभराच्या दीर्घ विश्रांतीनंतर कोहली आशिया चषकाद्वारे मैदानात परतला. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेनंतर कोहली ब्रेकवर होता. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने 34 चेंडूत 35 धावा केल्या होत्या. त्यानंतर तो डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकून झेलबाद झाला.

हा व्हिडीओ पाहिलाय का?

सामन्यानंतर कोहलीने औदार्य दाखवत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफची इच्छा पूर्ण केली. हरिसने कोहलीला त्याची जर्सी मागितली आणि त्याला ऑटोग्राफ देण्यास सांगितले. विराटने त्याची इच्छा पूर्ण करताना हे केले. त्याचा व्हिडिओ बीसीसीआयने ट्विटरवर शेअर केला आहे. क्रिकेट चाहत्यांना ते खूप आवडते.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.