AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Prithvi Shaw Triple Century: विराट कोहलीने सर्वांसमोर पृथ्वी शॉ ला घातली होती शिवी, नेमकं काय झालेलं?

Prithvi Shaw Triple Century: कोहलीने पृथ्वीला शिवी घातली होती. त्यावेळी विराट टीमचा कॅप्टन होता. हे शिवीकांड घडल्यानंतर पृथ्वीला फक्त चार सामने संधी मिळाली आणि तो टीमबाहेर गेला.

Prithvi Shaw Triple Century: विराट कोहलीने सर्वांसमोर पृथ्वी शॉ ला घातली होती शिवी, नेमकं काय झालेलं?
Virat-Kohli
| Updated on: Jan 11, 2023 | 1:37 PM
Share

Prithvi Shaw Triple Century: पृथ्वी शॉ ने रणजी ट्रॉफी सामन्यात ट्रिपल सेंच्युरी झळकवून सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलय. कुठल्याही सीरीजसाठी टीम निवडताना पृथ्वी शॉ च्या नावाची जरुर चर्चा होते. पण त्याला संधी मिळत नाही. असं नाहीय की. पृथ्वीची याआधी टीम इंडियात निवड झालेली नाही. पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून खेळलाय. पण खराब प्रदर्शन, दुखापतीमुळे तो टीम इंडियाच्या बाहेर गेला. तेव्हापासून पुनरागमनासाठी हा टॅलेंटेड खेळाडू संघर्ष करतोय. अशाच एका टूरवर असताना, विराट कोहलीने पृथ्वीला शिवी घातली होती. त्यावेळी विराट टीमचा कॅप्टन होता. हे शिवीकांड घडल्यानंतर पृथ्वीला फक्त चार सामने संधी मिळाली आणि तो टीमबाहेर गेला.

संजय मांजरेकरांचा रेकॉर्ड मोडला

पृथ्वी शॉ ने आसाम विरुद्ध गुवाहाटीच्या मैदानावर मुंबईकडून सर्वाधिक व्यक्तीगत धावा केल्या. त्याने 379 धावा बनवताना संजय मांजरेकर यांचा 1991 सालचा 377 धावांचा रेकॉर्ड मोडला. मांजरेकर यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये या धावा केल्या होत्या.

किती वर्षापासून पृथ्वी टीम इंडियाच्या बाहेर?

मोठ्या इनिंग खेळणाऱ्या पृथ्वी शॉ ला विराट कोहलीकडून शिवी ऐकावी लागली होती. या शिवीकांडानंतर पृथ्वी फक्त चार सामने खेळला. पृथ्वी तेव्हापासून जो बाहेर गेलाय, तो अजून टीममध्ये पुनरागमन करु शकलेला नाही. टीम इंडिया बाहेर जाऊन त्याला दीडवर्ष झालय.

नेमकं काय घडलेलं?

वर्ष 2020 मध्ये डिसेंबर महिन्यात एडिलेडच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीज सुरु होती. टेस्ट मॅचच्या दुसऱ्यादिवशी मैदानात पृथ्वीकडून एक चूक झाली, जी विराटला अजिबात सहन झाली नाही. त्या रागाच्या भरात विराटने पृथ्वीला शिवी घातली. बुमराह हसत होता

एडिलेड टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव सुरु होता. बुमराह इनिंगची 23 वी ओव्हर टाकत होता. स्ट्राइकवर असलेल्या लाबुशेनला बाऊन्सर टाकला. लाबुशेनने चेंडू पूल करण्याचा प्रयत्न केला. चेंडू स्क्वेयर लेगला असलेल्या पृथ्वीकडे गेला. पृथ्वीकडे सोपा झेल घेण्याची संधी होती. पण त्याने कॅच ड्रॉप केली. शॉ ने कॅच टाकल्यानंतर बुमरागच्या चेहऱ्यावर हास्य होते. विराटला भरपूर राग आला. त्याच रागात विराटने त्याला शिवी घातली.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच