गिल बाद होताच विराट कोहलीचा आक्रमकपणा, विजयानंतर शुबमनची 9 शब्दांची पोस्ट चर्चेत

आयपीएल 2026 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स सामना पार पडला. या सामन्यात आक्रमकपणा पाहायला मिळाला. शुबमन गिलची विकेट पडल्यानंतर विराट कोहलीने आक्रमकपणे सेलीब्रेशन केलं. त्यानंतर शुबमन गिलने एक फोटो पोस्ट करत 9 शब्दात काय सांगायचं ते सांगून टाकलं.

गिल बाद होताच विराट कोहलीचा आक्रमकपणा, विजयानंतर शुबमनची 9 शब्दांची पोस्ट चर्चेत
शुबमन गिल बाद होताच विराट कोहलीचा आक्रमकपणा, विजयानंतर शुबमन गिलची 9 शब्दांची पोस्ट चर्चेत
Image Credit source: Shubman Gill Instagram
| Updated on: May 01, 2026 | 5:23 PM

आयपीएल 2026 स्पर्धेतली 43वा सामना गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात पार पडला. या सामन्यात नाणेफेकीचा कौल गुजरात टायटन्सने जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय योग्यच ठरला. कारण आरसीबीला 155 धावांवर रोखलं आणि या धावा गुजरात टायटन्सने 15.5 षटकात पूर्ण केल्या. पण या सामन्यात खेळाडूंचा आक्रमकपणा पाहायला मिळाला. शुबमन गिलने विजयी धावांचा पाठलाग करताना 18 चेंडूत 43 धावांची खेळी केली. या दरम्यान शुबमन गिलला बाद करण्याची संधी चालून आली होती. विराट कोहलीने उत्तम क्षेत्ररक्षण करून चेंडू अडवला आणि यष्टींवर मारला. पण नेम चुकल्याने गिल धावबाद होण्यापासून वाचला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने त्याला झेल पकडला. या विकेटनंतर विराट कोहलीने शुबमन गिलकडे रागाने पाहिले आणि आक्रमकपणे विकेटचा जल्लोष साजरा केला. पण शुबमन गिलने तेव्हा काहीच प्रतिक्रिया दिली नाही.

आरसीबीला 6 गडी राखून मात दिल्यानंतर शुबमन गिलने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत विराट कोहली शुबमन गिलला रागाने पाहात आहे. तर दुसरा फोटो जेसन होल्डरसोबत शेअर केला आहे. या फोटोला ‘प्ले होल्ड जेसन होल्डर’ असे कॅप्शन दिले आहे. या सामन्यात संघाने दमदार कामगिरी केली. खरं तर त्याने आरबीच्या टॅगलाइनचं विडंबन केल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. कारण प्ले बोल्ड ही आरसीबीची टॅगलाईन आहे आणि शुबमन गिलची पोस्ट त्याच्याशी मिळतीजुळती आहे. त्यामुळे शुबमन गिलने या पोस्टमधून आरसीबी आणि विराट कोहली या दोघांना प्रत्युत्तर दिल्याचं बोललं जात आहे.

विशेष म्हणजे आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदारचा झेल जेसन होल्डरने पकडला होता. मात्र झेल घेताना चेंडू जमिनीवर घासल्याचं विराट कोहलीचं म्हणणं होतं. त्यामुळे त्याने संतापही व्यक्त केला. पण तिसर्‍या पंचांनी त्याला झेल बाद दिला. त्यामुळे शुबमन गिलने जेसन होल्डरसोबतचा पोस्ट केलेला फोटोही बरंच काही सांगून जातो. यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सला नमवल्यानंतर गिलने पिवळी शिट्टी हातात धरलेला फोटो पोस्ट केला होता. तर 2023 मध्ये गुजरात टायटन्से कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केलं होतं. तेव्हा शुबमन गिलने एका फोटोला डे रायडर्स असं कॅप्शन दिलं होतं.

Follow Us