AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : विराट कोहलीचं तसं वागणं पाहून चाहतेही चक्रावले! नेमकं काय झालं ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला असून दुसऱ्या सामन्यासाठी संपूर्ण संघ कानपूरमध्ये पोहोचला आहे. असं असताना विराट कोहलीचा एक व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. हा व्हिडीओ पाहून त्याच्या चाहत्यांनाही धक्का बसला आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या

Video : विराट कोहलीचं तसं वागणं पाहून चाहतेही चक्रावले! नेमकं काय झालं ते जाणून घ्या
| Updated on: Sep 25, 2024 | 3:20 PM
Share

भारत आणि बांग्लादेश यांच्यात दुसरा कसोटी सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ कानपूरला पोहोचले असून खेळाडूंचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. खासकरून विराट कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडाली होती. पण विराट कोहलीचं एक वाक्य चाहत्यांच्या थेट हृदयाला भिडलं आहे. खरंच विराट कोहली असं बोलला का? याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक चाहता विराट कोहलीला फूलांचा गुच्छ देत आहे. तसचे दुसरा चाहता त्याला हात मिळवण्याचा प्रयत्नात होता. पण विराट कोहलीने लगेच सांगितलं की, सर माझे दोनच हात आहेत. इतकंच तर विराटने फुलांचा गुच्छ दुसरंच कोणाच्या तरी हाती सोपवतो आणि निघून जातो. पण जेव्हा विराट कोहलीने फुलांचा गुच्छ हाती घेतला तेव्हा त्याच्या दुसऱ्या हातात टॅब होता. त्यामुळे त्याला तसं करणं शक्य झालं नाही.

विराट कोहलीच्या या व्हिडीओची सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा रंगली आहे. त्याच्या बहुतांश चाहत्यांना त्याची ही बाब आवडली नाही. इतकंच काय ट्रोलर्संनी विराट कोहलीवर टीका करण्यासही सुरुवात केली आहे. एका चाहत्याने सांगितलं की ‘पैसा आल्यानंतर सर्वच स्वत:ला देव समजू लागतात.’  तर दुसऱ्या चाहत्याने सांगितलं की, प्रत्येकाला हात मिळणवं काही होत नाही. त्याच्या दुसऱ्या हातात टॅब असल्याने त्याने नकार दिला आहे, असं दिसतंय.

विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून भारताऐवजी विदेशात राहणं पसंत करताना दिसत आहे. विराट कोहली मुलगा अकायच्या जन्माआधीपासून लंडनमध्ये राहात होता. त्यानंतर टी20 वर्ल्डकप खेळला आमि नंतर जेतेपद जिंकल्यानंतर थेट लंडनला गेला. श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी पुन्हा भारतात आला आणि पुन्हा लंडनमध्ये गेला. विराट कोहली भारतात कमी आणि लंडनमध्येच अधिक राहात असल्याची कुजबूज सुरु झाली आहे. पण लंडनमध्ये शिफ्ट झाला की नाही याबाबत अधिकृत असं काहीच समोर आलेलं नाही. पण विराट, अनुष्का आणि त्यांची मुलं आता लंडनमध्येच राहात आहेत.

विराट कोहलीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, रस्त्यावर मोकळेपणाने चालणं, शॉपिंग करणं आता होत नाही. भारतात रस्त्यावर चालणं तर खूपच कठीण आहे. विराट कोहलीच्या एकच झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते. तर तो रस्त्यावर चालताना दिसला तर काहीच सांगायला नको. पण लंडनमध्ये विराट कोहली मनमोकळेपणाने रस्त्यावर फिरताना दिसला. तसेच सामान्य लोकांप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये खात होता. शॉपिंग करताना त्याला पाहिलं गेलं आहे.

Follow Us
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात सर्वपक्षीय नेते एकवटले; ठाण्यात आज मोर्चा निघणार
राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी
Rahul Gandhi : राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन; इंडिया आघाडीत मोठ्या घडामोडी - सूत्र