AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराट कोहली याचं राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात स्पेशल ‘शतक’

प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आरसीबी संघाने 189 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहली याने आपलं विशेष शतक पूर्ण केलं आहे. 

Virat Kohli : विराट कोहली याचं राजस्थान रॉयल्सविरूद्धच्या सामन्यात स्पेशल 'शतक'
| Updated on: Apr 23, 2023 | 7:38 PM
Share

मुंबई : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि  राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये सामना सुरू आहे. या सामन्यामध्ये राजस्थान संघाने टॉस जिंकत फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या आरसीबी संघाने 189 धावा केल्या आहेत. राजस्थान रॉयल्स या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. या सामन्यादरम्यान विराट कोहली याने आपलं विशेष शतक पूर्ण केलं आहे.

नेमकं कोणतं शतक?

आरसीबीकडून सलामीला आलेला विराट शून्यावर बाद झाला. ट्रेंट बोल्ट याने विराटला तंंबूचा मार्ग दाखवला. मात्र लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल्सचे दोन खेळाडू कॅच आऊट केलं  झाले. दोन्ही खेळाडूंचे कॅच विराट कोहलीने घेतले. दोन कॅचसह विराटने आयपीएलमध्ये 101 कॅच पूर्ण केले.

राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल 47 धावा आणि देवदत्त पडिक्कल 52 धावांवर बाद झाले. दोन्ही खेळाडू फुलटॉस बॉलवर आऊट झाले. जयस्वाल याला हर्षल पटेल तर पडिक्कलला डेविड विलीने आपल्या गोलंदाजीवर आऊट केलं.  या दोन्ही कॅचसह विराटने आपलं कॅचचं शतक पूर्ण केलं आहे.

आरसीबीची बॅटींग 

आरसीबी संघाची सुरूवात एकदम  खराब झाली होती. विराट कोहली आणि शाहबाज अहमद याला  ट्रेंट बोल्ट या दोघांना बाद करत मोठे धक्के दिले होते. मात्र त्यानंतर फाफ आणि मॅक्सवेल यांनी 127 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. आरसीबीच्या 12 धावांवर दोन विकेट गेल्या होत्या त्यानंतर दोघांनी शतकी भागीदारी केली. 139ला फाफ धावबाद झाला होता त्यानंतर मॅक्सवेलही बाद झाला.  दिनेश कार्तिक 16 धावा , वानिंदू हसरंगा 6 धावा यांना मोठी खेळी करता आली नाही.

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली (C), फाफ डू प्लेसिस, महिपाल लोमरर, ग्लेन मॅक्सवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (W), सुयश प्रभुदेसाई, डेव्हिड विली, वानिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज, विजयकुमार वैशाख

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.