AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli ने क्रिकेट विश्वात रचला इतिहास तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अशी प्रतिक्रिया

World cup 2023 : क्रिकेट इतिहासात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने नवा विक्रम केला आहे. वनडे क्रिकेटमध्ये त्याने ५० शतके पूर्ण केले आहे. विराटने सचिन तेंडुलकर याचा ४९ शतकांचा रेकॉर्ड मोडला आहे. या नंतर संपूर्ण जगातून विराटवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान मोदींनी ही त्याचे कौतूक केले आहे.

Virat Kohli ने क्रिकेट विश्वात रचला इतिहास तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली अशी प्रतिक्रिया
MODI ON KOHLI
shailesh musale
shailesh musale | Updated on: Nov 15, 2023 | 8:27 PM
Share

WORLD CUP 2023 : एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध भारत सेमीफायनल सामन्यात विराट कोहलीने 50 वे शतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विश्वविक्रम मोडला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सचिनसह हजारो क्रिकेट चाहत्यांच्या उपस्थितीत त्याने हे त्याचं शतक साजरे केले. उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्याचं अभिनंदन केले. अनुष्का शर्माने देखील त्याच्या या शतकीय खेळीनंतर फ्लाईंग किस करत त्याच्यावरचं प्रेम व्यक्त केलं.

विराट कोहली आता वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर ४९ शतकांचा रेकॉर्ड आहे. या कामगिरीसाठी खुद्द सचिन तेंडुलकर याने उभे राहून त्याचे अभिनंदन केले.

शतक पूर्ण केल्यानंतर त्याने सचिन तेंडुलकरबद्दल देखील आदर व्यक्त केला. सोशल मीडियावर विराट कोहलीचे कौतूक होत आहे. प्रत्येक क्रिकेट चाहता त्याच्या या शतकीय खेळीवर आनंद व्यक्त करत आहे.

२०१५ च्या वनडे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये विराट कोहली आणि टीम इंडियाची कामगिरी खराब झाली होती. संघाच्या पराभवानंतर लोकांनी अनुष्का शर्माला देखील सोशल मीडियावर खूप ट्रोल केले आणि भारतीय संघाच्या पराभवासाठी तिला जबाबदार धरले होते.

विराट कोहलीने 113 चेंडूत 9 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 117 धावांची खेळी खेळली. ऐतिहासिक शतकासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोहलीचे अभिनंदन केले आहे.

आयसीसी विश्वचषक 2023 उपांत्य फेरीच्या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध 50 षटकात 4 गडी गमावून 397 धावा केल्या. भारताकडून विराट कोहलीने 117 आणि श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. या दोघांशिवाय शुभमन गिलने नाबाद 80 धावा केल्या. श्रेयस अय्यरने अवघ्या 70 चेंडूत 105 धावा केल्या. अय्यरने 67 धावांवर आपले शतक पूर्ण केले. आयसीसी विश्वचषक नॉकआऊट सामन्यांच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे.

Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान