AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2021: विलगीकरणाचा कालावधी संपताच विराट कोहली मैदानात, एबी डिव्हिलीयर्ससोबत गळाभेटीचा VIDEO पाहाच

बहुचर्चित इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL ला उद्यापासून (19 सप्टेंबर) सुरुवात होणार आहे. आतापर्यंतच्या सामन्यात उत्तम प्रदर्शन करत विराट कोहली कर्णधार असल

IPL 2021: विलगीकरणाचा कालावधी संपताच विराट कोहली मैदानात, एबी डिव्हिलीयर्ससोबत गळाभेटीचा VIDEO पाहाच
विराट आणि डिव्हिलियर्स
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 5:59 PM
Share

दुबई: भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आता संपूर्णपणे आयपीएलसाठीन (IPL) सज्ज झाला आहे. इंग्लंडमधून युएईत पोहोचलेला विराट नुकताच विलगीकरणाचा कालावधी संपवून मैदानात सरावासाठी उतरला आहे. कर्णधार विराट इतर आरसीबी संघातील खेळाडूंना नुकताच भेटला असून या सर्व भेटीचा व्हिडीओ आरसीबीने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला. यामध्ये विराट एकदम जोशात दिसत असून त्याने त्याचा सहकारी एबी डिव्हिलीयर्सची घेतलेली गळाभेट सर्वांचच मन जिंकत आहे.

विराट कोहली आधी इंग्लंडमध्ये पाचवी कसोटी खेळून मग युएईमध्ये आरसीबी संघासोबत जोडला जाणार होता. पण पाचवी कसोटी रद्द झाल्यामुळे विराट वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजसोबत 12 सप्टेंबर रोजीच युएईत दाखल झाला. त्यानंतर सहा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी संपूवत तो मैदानात सरावासाठी उतरला आहे. आता पहिला सामना आरसीबी सोमवारी म्हणजे 20 सप्टेंबरला कोलकाता नाइट रायडर्स संघाविरुद्ध खेळणार आहे. दरम्यान विराट मैदानात परतला असून इतरही खेळाडू सरावासाठी मैदानात आहेत. यावेळी सर्वजण एकमेकांची भेट घेत असातानाचा, विराट उत्तम असा सराव करत असतानाचा एक व्हिडीओ आरसीबीने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

कोहलीच्या आरसीबीसाठी यंदाची आयपीएल उत्तम

भारताचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत एकही आयपीएलचे जेतेपद पटकावलेले नाही. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये विराटचा संघ रॉयल चँलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) उत्तम प्रदर्शन करत आहे. त्यांनी उत्तम सुरुवात करत 7 पैकी 5 सामन्यांत विजय मिळवला आहे. यासोबतच ते 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहेत.

रॉयल चँलेजर्स बंगळुरु संघाचे उर्वरीत सामने

– 20 सप्टेंबर (सोमवार): आरसीबी vs केकेआर, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 24 सप्टेंबर (शुक्रवार): आरसीबी vs चेन्‍नई सुपरकिंग्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, शारजाह – 26 सप्टेंबर (रविवार): आरसीबी vs मुंबई इंडियन्स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 29 सप्टेंबर (बुधवार): आरसीबी vs राजस्‍थान रॉयल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई – 03 ऑक्टोबर (रविवार): आरसीबी vs पंजाब किंग्‍स, दुपारी 3:30 वाजता, शारजाह – 06 ऑक्टोबर (बुधवार): आरसीबी vs सनरायजर्स हैद्राबाद, सायंकाळी 7:30 वाजता, अबू धाबी – 08 ऑक्टोबर (शुक्रवार): आरसीबी vs दिल्‍ली कॅपिटल्‍स, सायंकाळी 7:30 वाजता, दुबई

हे ही वाचा 

T20 World Cup पूर्वी भारतीय संघ खेळणार दोन सराव सामने, असे असेल वेळापत्रक, BCCI चा मास्टर प्लॅन तयार

IPL च्या इतिहासात सर्वाधिक धावा खाणाऱ्या गोलंदाजांमध्ये दिग्गजांचाही समावेश, ‘ही’ नावं वाचून चकित व्हाल

IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

(Virat kohli finishes quarantine period and joins nets practice hugs ab de villiers see video posted by RCB)

Follow Us
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार