AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BAN vs IND : टीम इंडियाला ज्याने रडवलं, विराटने त्याच्यासोबत नक्की असं का केलं?

बांगलादेशच्या या खेळाडूचा आणि विराट कोहलीचा (Virat Kohli) हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय.

BAN vs IND : टीम इंडियाला ज्याने रडवलं, विराटने त्याच्यासोबत नक्की असं का केलं?
Team IndiaImage Credit source: सोशल मीडिया
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Dec 25, 2022 | 7:09 PM
Share

ढाका : टीम इंडियाने बांगलादेश (BAN vs IND 2ND Test) विरुद्धच्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात 3 विकेट्सने विजय मिळवला. टीम इंडियाने यासह 2-0च्या फरकाने मालिका जिंकली. टीम इंडियाला (Team India) विजयासाठी 145 धावांचे माफक आव्हान मिळाले होते. मात्र इतक्या धावांसाठी टीम इंडियाला 7 विकेट्स गमवावे लागले. विराट कोहलीने (Virat Kohli) या दरम्यान बांगलादेशच्या खेळाडूला एक झक्कास गिफ्ट दिलं. बांगलादेशच्या या खेळाडूचा आणि विराटचा हा फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होतोय. (virat kohli gifted to his autographed jersey to bangladesh cricket mehidy hasan ban vs ind 2nd test)

विराटने बांगलादेशच्या सामन्यानंतर मेहदी हसनला (Mehidy Hasan) एक खास गिफ्ट दिलं, जे नक्कीच मेहदीसाठी अविस्मरणीय असं असेल. मेहदीने विराटोसोबतचा एक फोटो शेअर केलाय. या फोटोत विराट स्वत:ची ऑटोग्राफ केलेली जर्सी मेहेदीला गिफ्ट देतोय.

मेहदी हसनचं ट्विट

मेहदीने टीम इंडियाला रडवलं

मेहदीने या कसोटी सामन्यात टीम इंडियाला चांगलंच रडवलवंय. मेहदीने दोन्ही सामन्यातील एकूण 4 डावात अनुक्रमे 4, 1, 1 आणि 5 असे 11 विकेट्स घेतले. दुसऱ्या सामन्यातील चौथ्या डावात श्रेयस आणि आश्विनची जोडी जमली नसती तर कदाचित मेहदीने बांगलादेशला विजयही मिळवून दिला असता.

श्रीलंकेचा भारत दौरा

नववर्षाची सुरुवात टीम इंडिया श्रीलंकेपासून करणार आहे. उभयसंघात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. प्रत्येकी 3 सामन्यांच्या या दोन्ही मालिका असणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी श्रीलंका भारत दौऱ्यावर येणार आहे. 2023 मध्ये एकदिवसीय वर्ल्ड कप स्पर्धा पार पडणार आहे. या दृष्टीने दोन्ही संघांसाठी एकदिवसीय मालिका ही महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे या मालिकेत टीम इंडिया कशी कामगिरी करते, याकडे निवड समितीसह क्रिकेट चाहत्यांचंही लक्ष असणार आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...