AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ Final : टीम इंडियाची टेन्शन वाढलं, अंतिम सामन्याआधीच विराट कोहलीसोबत घडलं असं काही

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अंतिम फेरीचा सामना होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या दिग्गज खेळाडूंकडे क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. खासकरून या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या विराट कोहलीकडून फार अपेक्षा आहेत. मात्र अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडिया आणि क्रीडाप्रेमींची धाकधूक वाढली आहे.

IND vs NZ Final : टीम इंडियाची टेन्शन वाढलं, अंतिम सामन्याआधीच विराट कोहलीसोबत घडलं असं काही
विराट कोहलीImage Credit source: PTI
| Updated on: Mar 08, 2025 | 5:32 PM
Share

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 9 मार्चला अंतिम फेरीचा सामना खेळला जाणार आहे. 25 वर्षानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. दोन्ही संघांनी जेतेपदासाठी जोरदार तयारी केली आहे. पण या सामन्यापूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे. कारण रनमशिन आणि चेजमास्टर विराट कोहलीच्या बातमीने चिंता वाढली आहे. एका रिपोर्टनुसार, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या सराव शिबिरात विराट कोहलीला दुखापत झाली आहे. कोहलीला ही दुखापत फलंदाजी करताना झाली. त्यामुळे सराव थांबवण्यात आला आणि वैद्यकीय टीमने त्याच्या तपासणी करण्यात लागली. त्याची दुखापत पाहता क्रीडाप्रेमी चिंतेत आहेत. पाकिस्तानी मिडिया रिपोर्टनुसार, आयसीसी अकादमीत विराट कोहली वेगवान गोलंदाजांचा सामना करत होता. यावेळी एक चेंडू थेट त्याच्या गुडघ्याला लागला. त्यामुळे त्याने तात्काळ फलंदाजी थांबवली. भारतीय फिजियोने धाव घेतली आणि त्याच्या देखभाल करण्यास सुरुवात केली. यानंतर विराट कोहली सरावासाठी उतरला नाही. इतर खेळाडू मात्र सराव करत होता. तर विराट कोहली त्या खेळाडूंचा सराव पाहात होता.

विराट कोहलीचा फिटनेस गेल्या काही दिवसांपासून चिंतेचा विषय ठरला आहे. इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यातही विराट खेळला नव्हता. गुडघ्याच्या दुखापतीमुळेच खेळला नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दुखापत झाल्याने क्रीडाप्रेमी चिंतेत आहेत. दरम्यान विराट कोहलीला झालेली दुखापत गंभीर नाही. भारतीय टीमच्या सपोर्ट स्टाफकडून सांगितलं की, कोहली फायनलसाठी फिट आहे आणि मैदानात उतरणार आहे.

विराट कोहलीची बॅट चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच चांगलीच तळपली आहे. पाकिस्तान विरूद्धच्या सामन्यात त्याची शतकी खेळी महत्त्वाची ठरली आहे. पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीने नाबाद 100 धावा केल्या आणि टीम इंडियाला विजय मिळवून दिला. इतकंच काय तर ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या सामन्यातही विराट कोहलीने 84 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विराट कोहलीने आतापर्यंत खेळलेल्या 4 सामन्यात 217 धावा केल्या आहेत. इतकंच काय गोल्डन बॅटच्या शर्यतीत आघाडीवर आहे.

Follow Us