AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CT 2025 : भारत न्यूझीलंड सामन्यात हे खेळाडू ठरू शकतात विजयाचे शिल्पकार! का ते जाणून घ्या

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना होत आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल ते प्लेइंग 11 सर्वच काही महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरीकडे, दोन्ही संघात सामना पालटण्याची ताकद ठेवणारे खेळाडू आहे. या खेळाडूंना रोखण्याचं मोठं आव्हान दोन्ही संघांपुढे असणार आहे. चला जाणून घेऊयात

CT 2025 : भारत न्यूझीलंड सामन्यात हे खेळाडू ठरू शकतात विजयाचे शिल्पकार! का ते जाणून घ्या
भारत न्यूझीलंडImage Credit source: New Zealand Twitter
| Updated on: Mar 08, 2025 | 4:33 PM
Share

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघांनी कंबर कसली आहे. साखळी फेरीतील पराभवानंतर न्यूझीलंडने धडा घेतला आहे. तर भारताला विजयानंतर गाफील राहून चालणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ आपआपल्या परीने तयारी करत आहेत यात काही शंका नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीत 25 वर्षानंतर भारत आणि न्यूझीलंड हे संघ आमनेसामने आले आहेत. 25 वर्षापूर्वी 4 विकेट आणि 2 चेंडू राखून न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. आता त्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी भारताकडे चालून आली आहे. अंतिम सामना जिंकून हिशेब बरोबर करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. या सामन्यात दोन्ही संघांच्या काही खेळाडूंकडे लक्ष असेल. कारण हे खेळाडू जबरदस्त फॉर्मात आहेत. त्यांचा फॉर्म पाहता अंतिम फेरीत डाव पालटण्याची ताकद ठेवतात. चला जाणून घेऊयात या खेळाडूंबाबत

साखळी फेरीत न्यूझीलंडला विजय रथाला वरुण चक्रवर्तीने ब्रेक लावला होता. त्याने पाच विकेट घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर ढकललं होतं. वरुण चक्रवर्ती गोलंदाजीसह फलंदाजीतही सक्षम आहे. दुसरीकडे, विराट कोहलीला सूर गवसला आहे. त्यामुळे हायप्रेशर सामन्यात त्याची खेळी महत्त्वाची ठरणार आहे. रोहित शर्मा आणि शुबमन गिलला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. तर हार्दिक पांड्या मधल्या फळीत फलंदाजी आणि गोलंदाजीत प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण उडवून देऊ शकतो.

न्यूझीलंडचा मॅट हेन्री आणि फिरकीपटू मिचेल सँटनर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतात. या दोन्ही गोलंदाजांनी साखळी फेरीत चांगली गोलंदाजी केली आहे. तसेच गोल्डन बॉलच्या शर्यतीत आहेत. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना यांचा सामना करताना काळजी घ्यावी लागेल. दुसरीकडे, फलंदाजीत रचिन रविंद्रला रोखण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

दोन्ही संघांचे खेळाडू

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, ऋषभ पंत.

न्यूझीलंड संघ: विल यंग, ​​रचिन रवींद्र, केन विल्यमसन, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर (कर्णधार), मॅट हेन्री, काइल जेमिसन, विल्यम ओरोर्क, नॅथन स्मिथ, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, जेकब डफी.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?