AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर विराट कोहली याने मौन सोडलंच, म्हणाला…

क्रिकेट वर्तुळात सर्वत्र लखनऊमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याची चर्चा आहे. अशातच यावर कोहलीची यावर प्रतिक्रिया आली आहे.

Virat Kohli : हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर विराट कोहली याने मौन सोडलंच, म्हणाला...
| Updated on: May 02, 2023 | 11:19 AM
Share

मुंबई : सोमवारी झालेल्या सामन्यामध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही पुन्हा एकदा भर मैदानात भिडताना दिसले.  दोघांमधील वाद काही नवीन नाही पण त्यामुळे क्रिकेटच्या प्रतिमेला डाग लागत आहे. कोहलीचं लखनऊ संघामधील काईले मेअर्स, नवीन उल हक, अमित मिश्रा आणि गौतम गंभीर यांच्यासोबत वाजलं. मैदानातील झकाझक सर्वांनी पाहिली. त्यामुळे क्रिकेट वर्तुळात सर्वत्र लखनऊमध्ये झालेल्या हाय व्होल्टेज ड्राम्याची चर्चा आहे. अशातच यावर कोहलीची यावर प्रतिक्रिया आली आहे.

विराट कोहली याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी ठेवली आहे. स्टोरीमध्ये, आपण जे काही ऐकतो ते एक मत आहे, तथ्य नाही. आपण जे काही पाहतो ते एक दृष्टीकोन आहे, सत्य नाही, अशा आशयाचा कोट कोहलीने पोस्ट केला आहे.

विराट कोहली आणि गौतम गंभीर एकमेकांचे कट्टर शत्रू असल्यासारखे दिसले. फक्त काहीतरी निमित्त होतं आणि दोघे एकमेकांना भिडतात. गंभीर आता काही खेळाडू नसून मेंटॉर आणि माजी लेजेंड खेळाडू आहे. किमान त्याने तरी अशा परिस्थितीमध्ये संयम ठेवायला हवा. विराट कोहली चुकीचं वागलाच  तर त्याला दंड होणारच आहे. पण नाही गौतम गंभीरसुद्धा एखाद्या युवा खेळाडूसारखा लगेच आक्रमक होऊन हमरीतुमरीवर येतो. याचा फटका म्हणजे आता दोन्ही खेळाडू  अनेक युवा खेळाडूंचे आयकॉन आहेत. त्या खेळाडूंनी यांच्याकडून कसला आदर्श घ्यायचा?

काय सुनावली शिक्षा?

कोहली आणि गंभीर दोघेही IPL च्या आचार संहिता उल्लंघनात दोषी ठरले आहेत. याची शिक्षा म्हणून त्यांची मॅच फी कापण्यात आली आहे. दोघांना लखनौमधील सामन्याची मॅच फी मिळणार नाही. शिक्षा म्हणून त्यांची 100 टक्के मॅच फी कापण्यात आली. विराट RCB च प्रतिनिधीत्व करतो. गौतम गंभीर लखनौ टीमचा मार्गदर्शक आहे.

समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव
पद्म पुरस्कारांची घोषणा! रघुवीर खेडकर, श्रीरंग लाड यांचा होणार गौरव.
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका
बिहार भवनाला विरोध, हा राऊतांचा दुटप्पीपणा; नवनाथ बन यांची टीका.
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला
मुख्यमंत्री फडणवीस नांदेडमध्ये श्री गुरुग्रंथ साहिबांच्या दर्शनाला.
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली
हिरव्या आणि भगव्या रंगाचा वाद पेटला, अंधारे आणि बन यांच्यात जुंपली.