VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, ‘माय नेम इज लखन’ गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच

यंदाच्या विश्वचषकातील पहिला विजय भारतीय संघाने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध मिळवला. या विजयानंतर सर्व देशवासियांसह खेळाडूही खुश असल्याचे पाहायला मिळाले. कर्णधार विराटने तर सामन्यादरम्यानचं मैदानावर थिरकला.

VIDEO: अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात मैदानातचं थिरकला विराट, 'माय नेम इज लखन' गाण्यावर डान्सचा व्हिडीओ पाहाच
विराट कोहली
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 7:09 PM

अबुधाबी: भारतीय क्रिकेट संघाने (Indian Cricket Team) दिवाळीच्या मूहूर्तावर टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) पहिला विजय मिळवला. बुधवारच्या भारत विरुद्ध अफगाणिस्तान (India vs Afghanistan) सामन्यात भारातने 66 धावांनी दमदार विजय मिळवला आहे. अबुधाबीच्या शेख जायद मैदानावर भारताने मिळवलेल्या या विजयामुळे मैदानातील सर्व प्रेक्षक अतिशय आनंदी दिसून आले. संपूर्ण सामन्यादरम्यान भारताचाच जयघोष घुमत होता. विशेष म्हणजे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) क्षेत्ररक्षण करताना प्रसिद्ध अशा ‘माय नेम इज लखन’ या अनिल कपूरच्या गाण्यावर थिरकलेला दिसून आला.

विराट जगातील एक अव्वल फलंदाज आहेच. पण सोबतच तो एखाद्या हिरोलाही लाजवेल अशा आपल्या स्टाईलमुळेही फेमस आहे. त्याची पत्नी अनुष्का भारतातील आघाडीची अभिनेत्री असल्याने त्याच्या घरातच बॉलीवुड आहे. अशावेळी अनेक रिएलिटी शो किंवा जवळच्यांच्या लग्नात विराट डान्स करताना दिसून येतो. विशेष म्हणजे तो उत्तम डान्स देखील करतो. याचाच प्रत्यय अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात आला. सामन्यात सुरुवातीपासून भारताने आपलं वर्चस्व ठेवलं होतं. त्यामुळे कोणत्याही तणावाखाली नसल्याने सर्वच खेळाडू आनंदी होते. त्याचवेळी क्षेत्ररक्षण करताना मैदानात लागलेल्या हिंदी गाण्यांवर विराट थिरकला. यावेळी त्याला प्रेक्षकांनी फोर्स केल्याचंही पाहायला मिळत आहे.

असा झाला सामना

सामन्यात नाणेफेक जिंकत अफगाणिस्तान संघाने इतर बहुतांश संघ यंदाच्या विश्वचषकात निवडत असल्याप्रमाणे प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा भारतीय सलामीवीरांना चूकीचा ठरवत धडाकेबाज फलंदाजी केली. केएल राहुल आणि रोहित शर्मा जोडीने सलामीला येत तब्बल 140 धावांची भागिदारी केली. त्यानंतर रोहित पाठोपाठ राहुलही बाद झाला. रोहितने 47 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकार ठोकत 74 धावा केल्या. तर राहुलने 48 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकार ठोकत 69 धावा केल्या. दोघेही बाद झाल्यावर फलंदाजीला आलेल्या पंत आणि पंड्या यांनीही आक्रमक फलंदाजी केली. पंड्याने नाबाद 35 आणि पंतने नाबाद 27 धावा केल्या. ज्याच्या जोरावर भारताने 210 धावा केल्या.

211 धावांचं मोठं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या अफगाणिस्तान संघाची सुरुवातच खराब झाली. पहिली सर्व फलंदाजाची फळी पटपट बाद होत गेली. पण कर्णधार मोहम्मद नबी आणि करीम जनत यांनी एक चांगली भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. नबीने 35 धावा केल्या. तर जनत याने नाबाद 42 धावा केल्या. पण भारताचं 211 धावांचं मोठं लक्ष्य अफगाणिस्तान गाठू शकलं नाही. ज्यामुळे भारताचा 66 धावांनी विजय झाला. भारताकडून सर्वाधिक विकेट्स शमीने घेतल्या. त्याने 3 गड्यांना बाद केलं. तर आश्विनने 2, बुमराह आणि जाडेजाने प्रत्येकी एक विकेट मिळवली.

हे ही वाचा :

मोठी बातमी: राहुल द्रविड टीम इंडियाचा नवा हेड कोच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची माहिती

T20 World Cup 2021: केवळ 38 चेंडूत ऑस्ट्रेलियाने संपवला सामना, बांग्लादेशला मात देत सेमीफायनलच्या दिशेने यशस्वी पाऊल

T20 World Cup 2021: आधी सामन्यात पराभूत केल्यानंतर आता विराटच्या मोठ्या रेकॉर्डलाही बाबरची गवासणी, नामिबियाविरुद्ध विक्रमाची नोंद

(Virat kohli Video of dance on ground during india vs afghanistan match went viral)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.