AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN | विराट कोहली बांगलादेशविरूद्ध खेळायला नसतानाही जगभर ट्रेंड, व्हिडीओ जोरदार व्हायरल

Virat Kohli Dance : सोशल मीडियावर कोहली जगभरात ट्रेंड होताना दिसत आहे. कोहली संघात नसतानाही इतका चर्चेत का आहे? विराटचा एक व्हिडीओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

IND vs BAN | विराट कोहली बांगलादेशविरूद्ध खेळायला नसतानाही जगभर ट्रेंड, व्हिडीओ जोरदार व्हायरल
| Updated on: Sep 15, 2023 | 9:09 PM
Share

मुंबई : भारत आणि बांगलादेशविरूद्ध सामन्यात संघात मोठा बदल पाहायला मिळत आहे. टीम मॅनेजंमेंटने संघातील तब्बल पाच खेळाडूंना खाली बसवलं आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीसुद्धा प्लेइंग 11 मध्ये नाही. मात्र सोशल मीडियावर कोहली जगभरात ट्रेंड होताना दिसत आहे. कोहली संघात नसतानाही इतका चर्चेत का आहे? विराटचा एक व्हिडीओ सोशळ मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

नेमकं व्हिडीओ का व्हायरल होतोय हे लक्षात आलं असेल, विक्रमांचा बादशहा असलेला विराट कोहली संघात सीनिअर खेळाडूंपैकी एक आहे. कोहली सामन्यादरम्यान खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन येताना दिसला. मात्र येताना गडी काही नीट नाही आला. कोहसी डान्सच्या स्टेप्स केल्यासारखा येत होता. बरं एकदा  नाही दोन वेळा विराटने हा अकडम तिकडम डान्स केला.

विराट कोहलीसारखा दिग्गज खेळाडू ड्रिंक्स  घेऊन गेल्याने चर्चा तर झालीच पण त्याने जाताना जो काही डान्स केला तो कायम क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात राहणारा आहे. विराटचे फॅन्स फक्त भारतातच नाहीतर जगभर आहेत. आपल्या रेकॉर्डमुळे कायम चर्चेत असणारा विराट आज या डान्यमुळे जगभर ट्रेंड करत आहे.

दरम्यान, आशिया कपमध्ये कोहलीने पाकिस्तानविरूद्ध शतक केलं होतं. या शतकासह विराटने 13000 हजार धावांचा टप्पा पार केला.  आजच्या सामन्यात बांगलादेश जिंकली तर काही फरक पडणार नाही. कारण भारताने आधीच फायनलमध्ये जागी मिळवली आहे. आशिया कपमध्ये आता श्रीलंकेसोबत भारताचा फायनलमध्ये सामना होणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल (W), इशान किशन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा

बांगलादेश (प्लेइंग इलेव्हन): लिटन दास (W), तनझिद हसन, अनामूल हक, शकीब अल हसन (C), तौहीद ह्रदोय, शमीम हुसैन, मेहदी हसन मिराझ, महेदी हसन, नसुम अहमद, तनझिम हसन साकिब, मुस्तफिजुर रहमान

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.