“रोहित शर्मा तरी कुठे…”, वीरेंद्र सेहवागने केली मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची पाठराखण

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. कर्णधार हार्दिक पांड्या टिकेचा धनी ठरला आहे. मुंबई इंडियन्सचे चाहते तर त्याला डिवचण्याची एकही संधी सोडत नाहीत. असं असताना माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग हार्दिक पांड्यासाठी मैदानात उतरला आहे.

रोहित शर्मा तरी कुठे..., वीरेंद्र सेहवागने केली मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याची पाठराखण
Follow us
| Updated on: Apr 23, 2024 | 6:25 PM

मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सने पुन्हा एकदा पराभूत केलं. एकदा मुंबईत येऊन वानखेडे मैदानावर पराभवाचं पाणी पाजलं. त्यानंतर जयपूरच्या मैदानात पराभूत केलं. मुंबई इंडियन्सचा स्पर्धेतील पाचवा पराभव असून प्लेऑफचं गणित खूपच क्लिष्ट झालं आहे. असं असताना कर्णधार हार्दिक पांड्यावर सर्वच बाजूने टीका होत आहे. मुंबई इंडियन्सचे चाहते पुरते नाराज असल्याचं दिसत आहे. मैदानात रोहित शर्माच्या नावाचा जयघोष करताना दिसत आहेत. असं असताना मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागने क्रिकबझवरील एका कार्यक्रमात विश्लेषण करताना हार्दिक पांड्याची बाजू मांडली. “हार्दिक पांड्यावर कोणताही दबाव असल्याचं मला वाटत नाही.”, असं माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने सांगितलं.

“हार्दिक पांड्याच्या स्वत:च्या अपेक्षांचं हे दडपण असू शकते. पण गेल्या वर्षीही मुंबई इंडियन्सची अशीच स्थिती होती. त्याआधीही रोहित शर्मा कर्णधार होता. त्याने कर्णधार म्हणून धावा केल्या नाहीत. दोन तीन वर्षात रोहित शर्माने कर्णधार म्हणून जेतेपद मिळवलं नाही. मुंबई इंडियन्सला माहिती आहे या आधीही अशीच स्थिती होती. जर त्याच्याकडून खूप अपेक्षा असतील आणि त्याला विकेट मिळत नसतील. धावा काढत नसेल. त्याच्या नेतृत्वात संघ हरत असेल, तर ते चुकीचे आहे.” असं वीरेंद्र सेहवाग म्हणाला. मुंबई इंडियन्सने शेवटचं जेतेपद 2020 मध्ये मिळवलं होतं.

गुजरात टायटन्सकडून ट्रेड विंडोच्या माध्यमातून मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला घेतलं. तसेच त्याच्याकडे नेतृत्व सोपवलं. पण आता त्याची कामगिरी पाहून टीकाकारांना आयतं कोलीत मिळालं आहे. इतकंच काय तर मैदानात प्रेक्षकांकडून वारंवार डिवचलं जात आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात 8 पैकी फक्त 3 सामन्यात विजय मिळाला आहे. मुंबईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने 8 सामन्यात 21.57 च्या सरासरीने 151 धावा केल्या आहेत. तर फक्त 4 गडी बाद करत इकोनॉमी रेट हा 11 आहे.

मुंबई इंडियन्सचे अजून 6 सामने शिल्लक आहेत. या सहा पैकी पाच सामन्यात काहीही करून विजय मिळवावा लागणार आहे. इतकंच काय तर नेट रनरेटही सकारात्मक ठेवणं भाग आहे. जर सहा पैकी सहा सामने जिंकले तर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल. पण एका सामन्यात पराभव झाला तर मात्र कठीण आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.