Ind vs Eng : …म्हणून भारताचा पराभव झाला, वीरेंद्र सेहवागने सांगितलं नेमकं ‘कारण’!

भारताचा पराभव नेमका का झाला, याचं विश्लेषण करताना वीरेंद्र सेहवागने नेमकं 'कारण' सांगितलं आहे. Virendra Sehwag

Ind vs Eng : ...म्हणून भारताचा पराभव झाला, वीरेंद्र सेहवागने सांगितलं नेमकं 'कारण'!
वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 1:54 PM

पुणे : दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाहुण्या इंग्लंडने भारताला (Ind vs England 2nd ODI) 6 विकेट्सने पराभवाची धूळ चारली. के.एल. राहुलच्या (K L Rahul) धमाकेदार शतकावर जॉनी बेअरस्टो (jonny bairstow) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी पाणी फेरलं. जॉनी बेअरस्टोने 124 धावांची खेळी केली तर स्टोक्सने 99 धावा फटकावताना 10 षटकार लगावले. इंग्लंडने हा सामना अतिशय सहज जिंकला. भारताला 336 धावा करुनही सामना गमवावा लागला. भारताचा पराभव नेमका का झाला, याचं विश्लेषण करताना भारताचा विस्फोटक माजी खेळाडू वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) नेमकं ‘कारण’ सांगितलं आहे. (Virendra Sehwag Statement On Why india Lost 2nd ODI Match Against England)

वीरेंद्र सेहवागकडून भारताच्या पराभवाचं विश्लेषण…

‘क्रिकबज’शी बोलताना वीरेंद्र सेहवागने भारताच्या पराभवाचं विश्लेषण केलं. तो म्हणाला, “भारतीय फलंदाजांनी इंग्लंडच्या फिरकीपटूंना (स्पिनर्सना) त्यांच्या पूर्ण ओव्हर्स टाकू दिल्या. स्पिनर्सविरोधात विरोधात आक्रमक बॅटिंग करण्याची गरज असताना भारतीय बॅट्समन त्यांच्याविरोधात शांत खेळले. जर मोईन अली आणि आदिल रशीदविरोधात भारतीय फलंदाजांनी आक्रमक फटके मारले असते तर भारत आणखी 20 ते 25 रन्स जोडू शकला असता. म्हणजेच भारताच्या जवळपास 360 धावा झाल्या असत्या. या लक्ष्याचा पाठलाग करणं इंग्लंडला नक्कीच सोपं नव्हतं”

पुढे बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाला, “इंग्लंडच्या फलंदाजांनी भारताच्या फिरकीपटूंवर आक्रमण केलं. बेन स्टोक्स आणि जॉनी बेअरस्टोने भारतीय फिरकीपटूंच्या बोलिंगच्या चिंधड्या उडवल्या. त्यांनी भारतीय फिरकीपटूंना अजिबातच सेट होऊ दिलं नाही. पहिल्या बॉलपासून त्यांनी भारतीय स्पिनर्सविरोधात आक्रमणाची भूमिका ठेवली, त्याच कारणास्तव इंग्लंडला भारतावर पलटवार करणं शक्य झालं.”

कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने धावांची खिरापत वाटली

टीम इंडियाच्या बोलर्सची खराब बोलिंग भारताच्या पराभवाला जबाबदार ठरली. भारतीय बॅट्समननी धावांचा डोंगर उभा करुन दिलेला असतानाही बोलर्सचा विशाल धावाही वाचवता आल्या नाही. फिरकीपटू कुलदीप यादव आणि क्रुणाल पांड्याने तर अक्षरश: धावांची खिरापत वाटली. क्रुणालने 6 ओव्हरमध्ये तब्बल 72 रन्स दिले. 12 हा त्याचा इकोनॉमी रेट होता. 72 धावांच्या बदल्यात त्याला एकही विकेट मिळवता आली नाही.

(Virendra Sehwag Statement On Why india Lost 2nd ODI Match Against England)

हे ही वाचा :

Ind vs Eng : के.एल राहुल ‘शेर’ तर स्टोक्स-बेअरस्टो ‘सव्वाशेर’, टीम इंडियाच्या पराभवाचे दोन व्हिलन

KL Rahul : दोन्ही डोळे बंद, हात कानाला, के एल राहुलच्या शतकी सेलिब्रेशनचा अर्थ काय? ‘राज की बात’ त्याच्याकडून…

Video : सॅम करनने भडकवलं, हार्दिक करनच्या मागे पळाला, अंपायर्सने थांबवलं, पाहा मैदानात काय काय घडलं…?

Non Stop LIVE Update
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.