
इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाबाबत इंग्लंडच्या माजी दिग्गज खेळाडूंनी बरीच भाकीत वर्तवली होती. भारताचा 4-0, 3-1 असा पराभव निश्चित आहे असं विधान केलं होती. पण भारतीय संघ या सर्वांना पुरून उरला. भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सोडली. तिसऱ्या सामन्यातच इंग्लंडकडे 2-1 अशी आघाडी होती. पण चौथ्या सामना ड्रॉ आणि पाचव्या सामन्यात विजय घशातून खेचून आणला. यानंतर सोशल मीडियावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न याला वसीम जाफरने डिवचलं आहे. या दोघांमध्ये कायम सोशल मीडियावर तू तू मैं मैं पाहायला मिळते. आता आयती संधी आल्यानंतर वसीम जाफर सोडणार नाहीच. वसीम जाफरने सोशल मीडियावरून एक ट्वीट करत चोख उत्तर दिलं आहे. त्याच्या ट्वीटनंतर दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांनी प्रतिक्रियाचा पाऊस पाडला आहे. खरं तर या ट्वीटमध्ये वसीम जाफरने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचाही उल्लेख केला आहे.
वसीम जाफरने अधिकृत सोशल मिडिया खात्यावरून ट्वीट केलं की, ‘डोनाल्ड ट्रम्प माझी आणि मायकल वॉन यांच्यात होणारी भांडण काही थांबवत नाहीत आणि अशा बातम्या पूर्णपणे चुकीच्या आहे. हे बरोबर नाही. सोशल मीडियावर युद्ध सुरुच राहील. या प्रकरणात लक्ष घातल्याने सर्वांचे आभार.’ डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतंच भारत पाकिस्तान युद्ध थांबवल्याची बतावणी केली होती. त्यामुळे सध्या हा मुद्दा खूपच चर्चेत आहे. त्यामुळे वसीम जाफरचं हे ट्वीट खूपच मजेशीर ठरत आहे. 3 ऑगस्टला मायकल वॉनने ट्वीट करत वसीम जाफरला टॅग केलं होतं. त्यात त्याने तू बरा आहे अशी आशा करतो असं लिहिलं होतं. पण 4 ऑगस्टला सर्व गेमच उलटा पडला.
Reports of Donald Trump negotiating a ceasefire between me and @MichaelVaughan are BASELESS and UNTRUE. The social media war will continue. Thank you for your attention to this matter. #ENGvIND
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) August 5, 2025
वसीम जाफरने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 260 सान्यात 50.67 च्या सरासरीने 19410 धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर 57 शतकं आहेत. टीम इंडियाकडून 51 सामने खेळला. यात त्याने 34.10 च्या सरासरीने 1944 धावा केल्या. त्याच्या नावावर पाच शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. दोन वनडे सामन्यात त्याने 5 च्या सरासरीने 10 धावा केल्यात.