आजा ये ले बेटे…! गिल, सिराज नाही तर या खेळाडूला ड्रेसिंग रूममध्ये दिला गेला अनोखा अवॉर्ड
अँडरसन तेंडुलकर मालिका बरोबरीत सुटली असली तरी खऱ्या अर्थाने भारताचा विजय आहे. कारण इंग्लंडच्या भूमीवर ही मालिका बरोबरीत सोडवणं खूपच कठीण काम होतं. त्यामुळे ओव्हलमधील विजयानंतर टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी एका खेळाडूचा विशेष गौरव करण्यात आला.

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत एका पेक्षा एक सरस सामने झाले. कोणताही सामना सहज जिंकला असं नाही. प्रत्येक सामन्यात विजयासाठी चांगलाच कस लागला. तिसरा कसोटी सामना तर भारताच्या हातून फक्त 22 धावांनी हुकला. पण उर्वरित दोन सामन्यात भारताने जबरदस्त कमबॅक केलं. शेवटच्या कसोटी सामन्यात तर अवघ्या 6 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे पाच सामन्यांची कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत सुटली. या मालिकेत शुबमन गिलने सर्वाधिक धावा केल्या. तर मोहम्मद सिराजने सर्वाधिक विकेट घेतल्या. पण भारतीय ड्रेसिंग रूममध्ये भलत्याच खेळाडूची चर्चा रंगली. त्याला या मालिकेतील इम्पॅक्ट प्लेयर म्हणून घोषित करण्यात आलं. 25 वर्षीय अष्टपैलून वॉशिंग्टन सुंदरला हा मानाचा पुरस्कार मिळाला. वॉशिंग्टन सुंदरने चार कसोटी सामन्यांच्या 8 डावात 47.33 च्या सरासरीने 284 धावा केल्या. यात त्याने एक शतक आणि एक अर्धशतक ठोकलं. तसेच 7 विकेट घेतल्या. याबाबतचा व्हिडीओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
ड़्रेसिंग रुममधील या व्हिडीओत प्रशिक्षक गौतम गंभीर याने खेळाडूंचं मनापासून कौतुक केलं. त्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द सीरीज हा पुरस्कार देण्यात आला. या मालिकेत गोलंदाजी आणि फलंदाजीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरला इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द सीरीज म्हणून निवडण्यात आलं. त्याला हा पुरस्कार रवींद्र जडेजाच्या हातून दिला गेला. यावेळी त्याने मजेशीर अंदाजात वॉशिंग्टन सुंदरला मेडल घातलं. ‘वॉशिंग्टन आजा ये ले बेटे’ असा संवाद साधला आणि त्याला मेडल दिलं.
𝗗𝗿𝗲𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗥𝗼𝗼𝗺 𝗕𝗧𝗦 | 𝗜𝗺𝗽𝗮𝗰𝘁 𝗣𝗹𝗮𝘆𝗲𝗿 𝗼𝗳 𝘁𝗵𝗲 𝗦𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗔𝘄𝗮𝗿𝗱
What happened in the #TeamIndia dressing room right after a memorable win at Kennington Oval 😊 🤔
Watch 🎥 🔽 #ENGvINDhttps://t.co/1qEZWSZmK2
— BCCI (@BCCI) August 5, 2025
इम्पॅक्ट प्लेयर ऑफ द सीरिज हा पुरस्कार मिळाल्यानंतर वॉशिंग्टन सुंदर म्हणाला की, ‘इंग्लंडमध्ये चार सामने खेळणं हे मोठं भाग्य आहे. मला कायम चांगली कामगिरी करायची होती. आम्ही संघ म्हणून दररोज चांगली कामगिरी केली ते आश्चर्यकारक होतं. क्षेत्ररक्षणातही आम्ही चांगली ऊर्जा निर्माण केली. आम्ही काय एकमेकांसाठी तयार होतो. प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद’
