
आयसीसी टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान आज 6 जून रोजी यजमान यूएसए विरुद्ध सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज आहे. तर यूएसएचा हा दुसरा सामना असणार आहे. यूएसएने या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात कॅनडाचा पराभव करत विजय विजयी सुरुवात केली. त्यानंतर आता यूएसए पाकिस्तानचा धुव्वा उडवत सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी सज्ज आहे. यूएसएचा कॅनडा विरुद्ध विजय मिळवल्यानंतर विश्वास वाढला आहे. त्यामुळे यूएसए विरुद्ध पाकिस्तान सामन्यात कडवी झुंज पाहायला मिळू शकते. या सामन्याच्या काही तासांआधी यूएसएचा कॅप्टन मोनांक पटेल याने पाकिस्तान थेट इशारा दिला आहे.
“एकदा का आम्ही मैदानात 30-40 मिनिटं मैदानात सेट झालो, तर आम्ही हा सामना जिंकू शकतो”, असा विश्वास मोनांक पटेल याने व्यक्त केला. मोनांक सिंह याच्या प्रतिक्रियेमुळे क्रिकेट विश्वात एकच चर्चा रंगली आहे. त्यात यूएसए क्रिकेट टीम यजमान आहे, त्यामुळे त्यांना घरच्या परिस्थितीचा फायदा असेल. त्यात यूएसए टीममध्ये कोरी एंडरसनसारखा अनुभवी खेळाडू आहे. त्यामुळे या सामन्यात चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.
दरम्यान टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिला सामना हा 2 जून रोजी यूएसए विरुद्ध कॅनडा यांच्यात झाला. यूएसएने चेसिंग करताना विक्रमी 195 धावांचं आव्हान पूर्ण केलं. कॅनडाने 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 194 धावा केल्या. यूएसएने या धावांचा पाठलाग करताना 3 विकेट्स गमावून 14 बॉलआधी विजय मिळवला. यूएसएने 17.4 ओव्हरमध्ये 197 धावा केल्या. यूएसएचा या विजयामुळे विश्वास दुणावलेला आहे. यूएसए या विश्वासासह पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे.
मोनांक पटेलला विश्वास
USA captain Monank Patel said, “once we have a good 30-40 minutes on the field against Pakistan, you never know. We can take the game away from them”. pic.twitter.com/i9plPIBX1y
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 6, 2024
युनायटेड स्टेट टीम : मोनांक पटेल (कॅप्टन आणि विकेटकीपर), स्टीव्हन टेलर, अँड्रिज गॉस, ॲरॉन जोन्स, कोरी अँडरसन, नितीश कुमार, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्क्विक, जसदीप सिंग, अली खान, सौरभ नेत्रवाळकर, मिलिंद कुमार, नॉथुश केंजिगे, निसर्ग पटेल आणि शायन जहांगीर.
पाकिस्तान टीम : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सैम अयुब, फखर जमान, इफ्तिखार अहमद, आझगम खान, शादाब खान, इमाद वसीम, हरिस रौफ, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, मोहम्मद अमीर, अब्बास आफ्रिदी, उस्मान खान आणि अबरार अहमद.