‘यांना मी सोडून….’ बिकनी गर्ल्ससोबत Chris Gayle ची रंगली जोरदार पार्टी, पहा VIDEO
वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मैदानापासून लांब असलेले गेल सध्या आपलं आयुष्य मस्त एन्जॉय करतोय.

मुंबई: वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेल सध्या क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मैदानापासून लांब असलेले गेल सध्या आपलं आयुष्य मस्त एन्जॉय करतोय. ख्रिस गेल मूळचा वेस्ट इंडिजचा खेळाडू आहे. पण भारतातही तो तितकाच लोकप्रिय आहे. भारतातही त्याच्या चाहत्यांची संख्या कमी नाहीय. ख्रिस गेलची लाइफ स्टाइल नेहमीच चर्चेचा विषय असते. कारण तो बिनधास्त आयुष्य जगतो.
आयपीएलच्या लिलावातून त्याने माघार घेतली
आयपीएलमधून ख्रिस गेलला भारतात जास्त लोकप्रियता मिळाली. आयपीएलमध्ये 14 वर्ष त्याने कोलकाता नाइट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि पंजाब किंग्स या 3 फ्रेंचायजींच प्रतिनिधीत्व केलं. यावर्षाच्या सुरुवातीला झालेल्या आयपीएलच्या लिलावातून त्याने माघार घेतली होती.
क्रिस गेल पार्टीमध्ये जास्त रमतो
ख्रिस गेल आता 42 वर्षांचा आहे. जगभरातील फ्रेंचायजी टी 20 लीग क्रिकेटमध्ये तो खेळतो. गेल लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय जाहीर करु शकतो. गेल क्रिकेटमधून सन्यास घेईल. पण पार्टी लाइफपासून तो दूर जाणार नाही. गेल पार्टी लवर आहे. मोठ्या मॅचच्याआधी अनेकदा तो क्लबमध्ये पार्टी करताना दिसलाय. पार्टी, मौज मस्ती केली, तरी दुसऱ्यादिवशी त्याची बॅटिंग देखील तितकीच खणखणीत असते.
गेलने दिली मजेशीर कॅप्शन
ख्रिस गेलच्या अशाच एका पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. प्रायव्हेट यॉटवर बिकिनी गर्ल्ससोबत त्याने पार्टी केली. त्या मौज, मस्तीचा व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर केलाय. काही मुलींसोबत त्याने या यॉटवर डान्स केला. गेलने या व्हिडिओसोबत मजेदार कॅप्शनही लिहिलं आहे. मुली पार्टी सोडून जाणार नाहीत, मी सुद्धा सोडून जाणार नाही, असं कॅप्शन गेलने या व्हिडिओला दिलय.
View this post on Instagram
गेल वेस्ट इंडिजच्या टीम बाहेर
गेल मागच्यावेळी वेस्ट इंडिजच्या टी 20 संघात दिसला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ग्रुप मॅचमध्ये तो खेळला होता. त्या सामन्यात त्याने फक्त 15 धावा केल्या होत्या. त्यानंतर गेल वेस्ट इंडिजच्या टीममधून बाहेर गेला. मागच्या महिन्यात त्याच्या टीमने सिक्सटी चॅम्पियनशिप जिंकली.
