AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anaya Banger: अनाया बांगरचं शिक्षण किती झालंय? धक्कादायक खुलासा… मोठा ट्विस्ट

अनाया बांगर कोण आहे? ती काय करते? याबाबत तुम्हाला माहिती असेल. मात्र आज आपण अनाया बांगरचे शिक्षण किती आहे? ते तिने कसे पूर्ण केले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Anaya Banger: अनाया बांगरचं शिक्षण किती झालंय? धक्कादायक खुलासा... मोठा ट्विस्ट
anaya bangar education
| Updated on: Sep 09, 2025 | 6:09 PM
Share

गेल्या काही महिन्यांपासून भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर चर्चेत आहे. अनायाचे आधीचे नाव आर्यन होते, मात्र लिंग बदलाची सर्जरी करून आर्यन आता अनाया बनली आहे. अनाया बांगर कोण आहे? ती काय करते? याबाबत तुम्हाला माहिती असेल. मात्र आज आपण अनाया बांगरचे शिक्षण किती आहे? ते तिने कसे पूर्ण केले याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनाया बांगरने शिक्षणाबद्दल स्वतः माहिती दिलेली आहे. ती एमए पास आहे मात्र ती एमए पास कशी झाली यामागे एक ट्विस्ट आहे. अनाया बांगर सध्या ‘राईज अँड फॉल’ नावाच्या रिअॅलिटी शो मध्ये दिसत आहे. या शो मध्ये अनायाने एमए पास होण्यामागील कहाणी सांगितली आहे. अनायाने काय म्हटले ते सविस्तर जाणून घेऊयात.

अनाया बांगर एमए कशी पास झाली?

अनाया बांगरचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ ‘राईज अँड फॉल’ या रिअॅलिटी शोमधील आहे. या व्हिडिओमध्ये अनाया बांगर तिने एमए कसे पास केले याबद्दल माहिती सांगितली आहे. अनाया माहिती सांगत असताना इतर स्पर्धकगी तिच्यासोबत होते. एका स्पर्धकाने तिला सत्य सांगू नको असा सल्ला दिला असल्याचेही दिसत आहे.

अनायाने आपल्या एमए पदवीबद्दल बोलताना सांगितले की, माझ्या पदवीसाठी मला CHAT GPT ची मदत झाली. Chat GPT च्या मदतीने मी एमएची डिग्री घेतली. हे ऐकल्यानंतर शोमधील सर्व स्पर्धकांना आश्चर्य वाटले. त्यांनी तिला सगळं सत्य सांगायचे नसते असा सल्ला दिला, यावर तिने म्हटलं की, मी क्रिकेटपटू आहे. मला याचा फरक पडत नाही.

अनाया या क्रिकेटपटूंसोबत खेळली आहे

अनाया बांगरने भारतीय खेळाडू यशस्वी जयस्वाल आणि सरफराज खान सारख्या क्रिकेटपटूंसोबत अंडर एज क्रिकेटमध्ये खेळले आहे. त्यावेळी अनायाचे नाव आर्यन असे होते. आता ती मुलापासून मुलगी बनली आहे, मात्र तरीही ती क्रिकेटमध्ये परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. ती अनेकदा क्रिकेटचा सराव करत असते. याचे सर्व ती व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट करत राहते.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...