AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहम्मद सिराजच्या ‘त्या’ मेसेजचा अर्थ काय? क्रिकेटविश्वात रंगली जोरदार चर्चा

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर असून वनडे मालिकेनंतर कसोटी मालिका खेळणार आहे. असं असताना गेल्या काही दिवसांपासून भारतीय खेळाडूंच्या क्रिप्टिक मेसेजमुळे बरंच काही दडल्याचं दिसून येत आहे. जसप्रीत बुमराहनंतर आता मोहम्मद सिराजने एक मेसेज टाकला असून त्याची चर्चा रंगली आहे.

मोहम्मद सिराजच्या 'त्या' मेसेजचा अर्थ काय? क्रिकेटविश्वात रंगली जोरदार चर्चा
मोहम्मद सिराजच्या इन्स्टास्टोरीमागचं गूढ काय? सोशल मीडियावर तर्कवितर्कांना उधाण
| Updated on: Dec 21, 2023 | 3:04 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवानंतर टीम इंडियात बरीच उलथापालथ सुरू आहे. पण नेमकं काय सुरु आहे? कोणाच्या मनात काय चाललंय याचा थांगपत्ता लागत नाही. क्रिप्टिक मेसेजमुळे गेल्या काही दिवसांपासून तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. जसप्रीत बुमराहने आयपीएल ट्रेड विंडोनंतर एक क्रिप्टिक मेसेज टाकला होता. त्यात त्याने कधी कधी गप्प बसणं चांगलं असतं असं लिहिलं होतं. त्याचा थेट संबंध त्यानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याशी जोडला जात आहे. मुंबईने गुजरातशी ट्रेड करून हार्दिक पांड्याला ताफ्यात घेतलं. तसेच रोहित शर्माकडून कर्णधारपदाची जबाबदारी काढून त्याच्याकडे दिली. आता असाच काहीसा मेसेज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या मोहम्मद सिराजने टाकला आहे. पण त्या मागचा नेमका अर्थ कुणालाच कळलेला नाही. त्यात हृदय तुटल्याच्या पाच इमोजी आहेत.  आयपीएल लिलावाबाबत नाराजी किंवा भविष्यात काहीतरी मोठी घडामोड आरसीबीत संघात होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

आयपीएल लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर भरभरून पैशांची उधळण झाली. आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत निघाले. मिचेल स्टार्कला 24.75 कोटी, तर पॅट कमिन्सला 20.50 कोटी रुपयांची रक्कम मिळाली. तर दुसरीकडे भारतीय स्टार खेळाडूंना हवा तसा भाव मिळाला नाही. त्यामुळे मोहम्मद सिराजने नाराजी व्यक्त केली असावी असा अंदाज क्रीडाप्रेमी सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. आरसीबीने आपल्या संघात फारसा बदल केलेला नाही. सहा खेळाडूंना विकत घेतलं. त्यात मागच्या पर्वात मुंबईकडून खेळलेल्या कॅमरून ग्रीनचा समावेश आहे.

सोशल मीडियावर मोहम्मद सिराजच्या पाच इमोजींचा अर्थ वेगवेगळ्या पद्धतीने लावला जात आहे. एका युजर्सने तर पाच इमोजीची तुलना विराटच्या नावातील पाच अक्षरांशी करून हा मेसेज असावं असं सूचित केलं आहे. तर दुसऱ्या युजर्सने मिश्किलपणे लिहिलं आहे की, सिराजला आरसीबीचं कर्णधारपद हवं आहे. त्यामुळे आता या इन्स्टास्टोरीवर काही दिवस चर्चा रंगणार यात शंका नाही. सिराजने याचा खुलासा केला तर चर्चांना पूर्णविराम लागेल. अन्यथा भविष्यात एखादी मोठी घडामोड घडली तर त्याचा संबंध या क्रिप्टिक मेसेजशी जोडला जाईल.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु | फाफ डु प्लेसीस (कर्णधार), विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, रजत पाटीदार, अनुज रावत, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, कैमरून ग्रीन, विशक विजय कुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपली, हिमांशु शर्मा, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्निल सिंह, राजन कुमार, अल्झारी जोसेफ, यश दयाल आणि सौरव चौहान.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.