AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला संघातून डच्चू? लखनौविरुद्ध न खेळण्याचं कारण आलं पुढे

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी सुमार दर्जाची राहिली आहे. स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं असताना दहाव्या सामन्यात हार्दिक पांड्याचं नाव प्लेइंग 11 मधून गायब होतं. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. असं का ते जाणून घ्या.

Hardik Pandya: हार्दिक पांड्याला संघातून डच्चू? लखनौविरुद्ध न खेळण्याचं कारण आलं पुढे
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला संघातून डच्चू? लखनौ विरुद्ध न खेळण्याचं कारण आलं पुढेImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 04, 2026 | 8:47 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेच्या 47 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल झाला तेव्हा मुंबई इंडियन्सकडून सूर्यकुमार यादव मैदानात आला. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं. एकीकडे मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरू असताना हार्दिक पांड्याऐवजी सूर्यकुमार यादव मैदानात येणं हे आश्चर्यकारक होतं. या सामन्यात हा खेळाडू का खेळत नाही? त्याला संघातून काढलं का? त्याचं कर्णधारपद काढून घेतलं का? असे एक ना अनेक प्रश्न सोशल मीडियावर विचारले जात आहेत. त्याला कारणही तसंच आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सची पार वाट लागली आहे. त्यात हार्दिक पांड्याचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. फलंदाजी-गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं सहाजिकच आहे. लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यान नसल्यांना चर्चांना उधाण आलं आहे.

हार्दिक पांड्या का खेळत नाही?

लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असल्याने खेळत नाही. मुंबई इंडियन्सचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीवेळी याबाबत सांगितलं. त्याच्या कंबरेतील दुखापतीमुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. या पर्वात हार्दिक पांड्या दुसऱ्यांदा सामना खेळला नाही. तेव्हाही सूर्यकुमार यादवने कर्णधारपद भूषवलं होतं. हार्दिक पांड्या संघात नसला तरी रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा पाच सामन्यात खेळला नव्हता. तसं पाहिलं तर या पर्वात हार्दिक पांड्याची निराशाजनक कामगिरी आहे. त्याने 8 सामन्यात 20.8 च्या सरासीरीने 146 धावा केल्या आहेत. तर फक्त चार विकेट काढल्या आहेत. इकोनॉमी रेटही प्रति षटक 11 पेक्षा जास्त आहे.

हार्दिक पांड्याचं कर्णधारपद संकटात?

हार्दिक पांड्याचं कर्णधारपद संकटात आलं आहे. हार्दिक पांड्या सलग तिसऱ्या पर्वात मुंबईचं कर्णधारपद भूषवत आहे. 2024 या पर्वात त्याने पहिल्यांदा कर्णधारपदाची धुरा हाती घेतली होती. या पर्वात त्याच्या नेतृत्वात संघाने सुमार कामगिरी केली. पण मागच्या पर्वात प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं होतं. पण यंदा पु्न्हा सुमार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याचं कर्णधारपद संकटात आलं आहे.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली