AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Sharma : आला रे आला, हिटमॅन रोहित शर्माचं कमबॅक, वानखेडेत मुंबईचा राजाच्या घोषणा

आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्स दहावा सामना खेळत आहे. आतापर्यंत 9 सामन्यात 7 सामने गमावले आहे. जर तरची लढाई झाली तर हा सामना जिंकणं भाग आहे. असं असताना या सामन्यात मुंबई इंडियन्सने कर्णधार बदलला आणि रोहित शर्माचंही कमबॅक झालं.

Rohit Sharma : आला रे आला, हिटमॅन रोहित शर्माचं कमबॅक, वानखेडेत मुंबईचा राजाच्या घोषणा
Rohit Sharma : आला रे आला, हिटमॅन रोहित शर्माचं कमबॅक, वानखेडेत मुंबईचा राजाच्या घोषणाImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: May 04, 2026 | 7:25 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 47वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होत आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो या मरोची स्थिती असा आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला तर स्पर्धेतून बाद होणारा पहिला संघ ठरेल. लखनौ सुपर जायंट्सने हा सामना गमावला तर त्याचं गणित 14 गुणांवर येईल. त्यामुळे दोन्ही संघांना या स्पर्धेत काठावरचं अस्तित्व टिकवायचं असेल तर विजय महत्त्वाचा आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्स कर्णधार बदलला आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या खेळत नसल्याने कर्णधारपदाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर आहे. इतकंच काय तर पाच सामन्यानंतर रोहित शर्माचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे या सामन्यात मुंबई इंडियन्स संघात बदल पाहायला मिळत आहे. हार्दिक पांड्या न खेळण्याचं कारणही चर्चेत आहे. याबाबत कर्णधार सूर्यकुमार यादवने काय सांगितलं? जाणून घ्या

सूर्यकुमार यादव म्हणाला की, ‘आम्ही प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करत आहोत. खेळपट्टी चांगली दिसत आहे. आज रात्री हवा थोडी दमट आहे. वारा नाही. दुसऱ्या डावात, गेल्या 2-3 सामन्यांमध्ये इथे काय घडले ते आम्ही पाहिले. त्यामुळे परिस्थिती थोडी सुधारली आहे. म्हणून फक्त याचा फायदा घ्यायचा आहे आणि गोलंदाजांना संधी द्यायची आहे.’ सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्याबाबत म्हणाला की, ‘आज त्याची तब्येत बरी नाही, त्यामुळे मी त्याच्या जागी कर्णधारपद भूषवत आहे. पण हो, बाकी सर्व ठीक आहे. ट्रेंट बोल्टच्या जागी कोबिन बॉश नक्कीच संघात आहे आणि आपला रोहित शर्माही परत आला आहे .’

सूर्यकुमार यादव पुढे म्हणाला की, मुंबई इंडियन्स अशा परिस्थितीत खेळण्यासाठी ओळखली जात नाही. या वस्तुस्थितीपासून तुम्ही दूर पळू शकत नाही. पण शेवटी, हा फक्त एक खेळ आहे, खेळाचाच एक भाग आहे, तुम्हाला मान वर करून, ज्या कारणासाठी तुम्ही खेळता त्यासाठी खेळावे लागेल आणि हात वर करावे लागतील. तो अभिमान बाळगा आणि खेळाचा आनंद घ्या. आपण निश्चितपणे आपला सर्वोत्तम प्रयत्न करू शकतो. आपले पाच सामने शिल्लक आहेत. शक्य तितके जास्त सामने जिंकण्याचा प्रयत्न करा. आपला आत्मविश्वास दाखवा, खेळाचा आनंद घ्या आणि प्रेक्षकांना आपल्या खेळाचे चांगले प्रदर्शन दाखवा.’

Follow Us
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...