AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2025 या वर्षात टीम इंडियाचं वनडे, टी20 आणि टेस्ट मालिकेचं कसं आहे वेळापत्रक, जाणून घ्या

टीम इंडियासाठी 2025 वर्ष स्थित्यंतराचं असणार आहे. या वर्षात टीम इंडियाची नव्याने बांधणी होणार आहे. कारण रोहित शर्मा आणि विराट कोहली हे निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. त्यामुळे कसोटी आणि वनडे संघाची नव्याने बांधणी करावी लागणार आहे. खासकरून कर्णधारपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर पडणार हे सर्वकाही ठरवावं लागणार आहे. चला जाणून घेऊयात 2025 वर्षात टीम इंडियाचं वेळापत्रक कसं आहे ते

2025 या वर्षात टीम इंडियाचं वनडे, टी20 आणि टेस्ट मालिकेचं कसं आहे वेळापत्रक, जाणून घ्या
| Updated on: Dec 31, 2024 | 2:21 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता तिघंही वनडे आणि कसोटी सामन्यात खेळतात. आता पुढच्या वर्षात रोहित आणि विराटच्या निवृत्तीचे वेध लागले आहेत. कदाचित भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी पात्र ठरला नाही. तर या दोघांसाठी ही बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका शेवटची ठरू शकते. 2025 या वर्षात टीम इंडिया इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, वेस्ट इंडिज, बांग्लादेश यांच्यासोबत मालिका खेळणार आहे. तर चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धा खेळणार आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये, तर आशिया कप टी20 फॉर्मेटमध्ये आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिकेतील पाचवा कसोटी सामना  3 ते 7 जानेवारी दरम्यान  (सिडनी) खेळला जाईल.

भारतीय संघ 2025 या वर्षात पाच वनडे मालिका खेळणार आहे. यात चॅम्पियन्स ट्रॉफीचा समावेश आहे. तर दोन मालिका घरच्या मैदानावर तर दोन विदेशात खेळणार आहे. इंग्लंडविरुद्ध 3 सामने (होम ग्राउंड), चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (दुबई), बांगलादेशविरुद्ध 3 सामने (भारताबाहेर), ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3 सामने (भारताबाहेर), दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 3 सामने (होमग्राउंड) असं वनडे मालिकेचं वेळापत्रक आहे.

भारत 2025 या वर्षात पाच टी20 मालिका खेळणार आहे. यात आशिया कप 2025 चा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका (होमग्राउंड), बांगलादेशविरुद्ध तीन सामन्यांची टी20 मालिका (भारताबाहेर), आशिया कप 2025, ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका (भारताबाहेर), दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका (होमग्राउंड) असं वेळापत्रक आहे.

भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळवणार की नाही हे अजून पक्कं नाही. कदाचित टीम इंडियाच्या पदरी निराश पडेल असं दिसत आहे. 2025 वर्षात बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळणार आहे. त्यानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरी गाठली तर एक सामना खेळेल. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका (भारताबाहेर), वेस्ट इंडिज विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) आणि दक्षिण अफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका (होमग्राउंड) असं वेळापत्रक असेल.

टीम इंडियाकडून नववर्ष 2025 मधून फार अपेक्षा आहेत. खासकरून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने यश मिळवावं अशी क्रीडाप्रेमींची अपेक्षा आहे. कारण मागच्या पर्वात पाकिस्तानने भारताचा अंतिम फेरीत धु्व्वा उडवला होता. त्यामुळे विजयाचं स्वप्न भंगलं होतं.

भारत विरुद्ध इंग्लंड (5 टी20, 3 वनडे)

  • पहिला T20I: 22 जानेवारी (चेन्नई)
  • दुसरी T20I: 25 जानेवारी (कोलकाता)
  • तिसरा T20I: 28 जानेवारी (राजकोट)
  • चौथा T20I: 31 जानेवारी (पुणे)
  • पाचवा T20I: 2 फेब्रुवारी (मुंबई)
  • पहिली वनडे: 6 फेब्रुवारी (नागपूर)
  • दुसरी वनडे: 9 फेब्रुवारी (कटक)
  • तिसरी वनडे: 12 फेब्रुवारी (अहमदाबाद)

चॅम्पियन्स ट्रॉफी – फेब्रुवारी-मार्च 2025

  • भारत विरुद्ध बांगलादेश: 20 फेब्रुवारी (दुबई)
  • भारत विरुद्ध पाकिस्तान: 23 फेब्रुवारी (दुबई)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड: 2 मार्च (दुबई)
  • उपांत्य फेरी (पात्र असल्यास): 4 मार्च (दुबई)
  • अंतिम (पात्र असल्यास): 9 मार्च (दुबई)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल (पात्र असल्यास)

11 ते 15 जून 2025 (लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड)

भारत विरुद्ध इंग्लंड (5 कसोटी)

  • पहिली कसोटी: जून 20-24 (हेडिंगली)
  • दुसरी कसोटी:  जुलै 2-6 (एजबॅस्टन)
  • तिसरी कसोटी: जुलै 10-14 (लॉर्ड्स)
  • चौथी कसोटी: जूलै 23-27 (मँचेस्टर)
  • पाचवा कसोटी:  31 जुलै ते 4 ऑगस्ट (ओव्हल)

भारताच्या इतर मालिका

  • भारत वि बांगलादेश (3 वनडे,  3 T20I) – ऑगस्ट 2025
  • भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (2 कसोटी) – ऑक्टोबर 2025
  • आशिया कप T20 स्पर्धा – ऑक्टोबर-नोव्हेंबर 2025
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (3 वनडे, 5 टी20) – नोव्हेंबर 2025
  • भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2 कसोटी, 3 एकदिवसीय, 5 T20) — नोव्हेंबर-डिसेंबर.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा