AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli Linkedin : विराट कोहलीची नवी सुरुवात? 37 व्या वर्षी…चाहतेही झाले चकित, त्या निर्णयाची होतेय चर्चा!

LinkedIn वर असलेले हे खाते विराट कोहलीचेच असल्याचा दावा केला जातोय. म्हणूनच अवघ्या काही तासात या खात्याला तब्बल 52 हजार लोकांनी फॉलो केलंय. अजूनही बरेच लोक या खात्याला फॉलो करत आहेत.

Virat Kohli Linkedin : विराट कोहलीची नवी सुरुवात? 37 व्या वर्षी...चाहतेही झाले चकित, त्या निर्णयाची होतेय चर्चा!
virat kohli linkedinImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 10:01 PM
Share

Virat Kohli  LinkedIn Account : भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली नेहमीच चर्चेत असतो. यावेळी मात्र सध्या विराट वेगळ्या कारणामुळे चर्चेचं कारण ठरलाय. तो क्रिकेटमधील किंग तर आहेच परंतु गुंतवणुकीच्या बाबतीतही विराटने मोठी कमाल केलेली आहे. त्याने स्वत:चा ब्रँडही सुरू केलेला आहे. सोशल मीडियावर विराट कोहलीची मोठी फॅन फॉलोइंग आहे. विराटच्या एका फेसबूक, इन्स्टाग्राम पोस्टवर लाखोंनी लाईक येतात. दरम्यान, आता विराट कोहलीने एका नव्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. त्याच्या या कथित निर्णयाची सगळीकडेच चर्चा होतेय.

विराट कोहलीची नव्या क्षेत्रात एन्ट्री?

विराट कोहलीने LinkedIn वर आपलं खातं खोलल्याचं बोललं जातंय. विराटच्या या कथित खात्याचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. विशेष म्हणजे आतापर्यंत साधारण 52 हजार लोकांनी त्याला LinkedIn वर फॉलोही केलंय. एकीकडे व्हायरल होत असलेले LinkedIn खाते हे विराट कोहलीचेच आहे, असा दावा केला जातोय. तर दुसरीकडे या खात्याच्या सत्यतेबाबत अनेक प्रश्न विचारले जातायत. विराट कोहलीनेही आतापर्यंत या खात्याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.

विराट कोहलीने कुठे कुठे गुंतवणूक केली?

विराट कोहलीने LinkedIn वर आपले प्रोफाईल क्रिएट केल्याचे बोलले जातेय. या खात्यावर मी एक क्रिकेटर आहे, अशी माहिती देण्यात आलीय. तसेच विराट कोहलीच्या व्यवसायाबद्दलही या खात्याच्या बायोमध्ये सांगण्यात आलंय. व्हायरल होत असलेल्या प्रोफाईलनुसार कोहलीने 2025 साली एजिलिटासमध्ये गुंतवणूक केलेली आहे. विराट 2026 सालापासून one8world या ब्रँडचा सहसंस्थापकही असल्याचे या प्रोफाईलमध्ये सांगण्यात आलेय.

LinkedIn खात्याच्या सत्यतेबाबत प्रश्नचिन्ह

दरम्यान, LinkedIn वर असलेले हे खाते विराट कोहलीचेच असल्याचा दावा केला जातोय. म्हणूनच अवघ्या काही तासात या खात्याला तब्बल 52 हजार लोकांनी फॉलो केलंय. अजूनही बरेच लोक या खात्याला फॉलो करत आहेत. परंतु LinkedIn वर माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर, क्रिकेटर ऋषभ पंत यांच्या नावापुढे व्हेरिफाईड बॅज नाही. तसेच LinkedIn प्रिमियमबाबतही या खात्यावर काहीच माहिती नाही. विराट कोहली किंवा त्याच्या टीमकडूनही याबाबत काहीच सांगण्यात आलेलं नाही. त्यामुळे हे खाते विराटचेच आहे का? असा सवाल उपस्थित केला जातोय. परंतु सध्या सोशल मीडियावर LinkedIn वरील त्या खात्याची मात्र सगळीडेच चर्चा होतेय.

Follow Us
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
गोल्डनंतर आता प्लॅटिनम अवॉर्ड; My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
Mahayuti : Eknath Shinde : महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती, नेमकं कारण काय?
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
Rahul Gandhi : राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक; ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी पुढची रणनीती ठरणार?
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
Shekhar Bhoyar : भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
Shivsena : शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली; ठाकरे-शिंदे गटाचं लक्ष नव्या तारखेकडे
जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
Gold-Silver Rate Update : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी; जळगावच्या सराफा बाजारात दर घसरले, आजचे भाव किती?
सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत..
Price Rate Hike : सणासुदीत सर्वसामान्यांना महागाईचा झटका; ताटातील भाजीपासून डाळीपर्यंत सर्वच महाग, काय आहेत नवे दर?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत शिंदेंनी दिली.....
Eknath Shinde On Thane Purneker Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात नवीन अपडेट समोर; तपासाबाबत एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात....
Bihar Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात पाटण्यात आंदोलनाचा भडका; गांधी मैदानात विद्यार्थी संघटनांची जोरदार घोषणाबाजी
बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे....
Navi Mumbai : बेलापूर वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर तब्बल एवढी बोगस मतदारांची नावे; गजानन काळेंचा खळबळजनक दावा