AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्या

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात दुसरा वनडे सामना सुरू आहे. या सामन्यात कर्णधार शुबमन गिलने दीड शतकी खेळी केली. त्याने 110 चेंडूत 154 धावा केल्या. पण मैदानात खेळत असताना त्याच्या गळ्याभोवती काही तरी बांधलेलं दिसलं. चला जाणून घेऊयात त्याबाबत...

अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्या
अफगाणिस्तानविरुद्धचा सामना खेळताना शुबमन गिलने गळ्यात काय घातलं होतं? जाणून घ्याImage Credit source: BCCI Twitter
| Updated on: Jun 17, 2026 | 5:49 PM
Share

India vs Afghanistan, 2nd ODI: भारतीय वनडे संघाचा कर्णधार शुबमन गिल अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर उतरला. या सामन्यात यशस्वी जयस्वाल असल्याने त्याने ओपनिंगला येणं टाळलं आणि तिसऱ्या स्थानावर उतरला. पण तिसऱ्या क्रमांकावर उतरूनही त्याने जबरदस्त खेळी केली. तक्याने 110 चेंडूंचा सामना 154 धावा ठोकल्या. लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये त्याने दीड शतकी खेळी केली. पण यावेळी त्याच्या गळ्याभौवती पांढऱ्या रंगाचं काही तरी बांधल्याचं दिसून आलं. खरं तर यापूर्वी असं कोणी बांधलेलं पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळे नेमकं काय आहे? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आता शुबमन गिलने गळ्याभोवती काय बांधलं होतं आणि त्याचं काय फायदे आहेत? वगैरे असे प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्याचं उत्तर पुढे जाणून घ्या.

शुभमन गिलने गळ्याला बांधला खास टॉवेल

शुबमन गिलने आपल्या गळ्याभोवती पांढऱ्या रंगाचा एक खास टॉवेल बांधला होता. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. भारतात प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे उन्हात उभं राहून खेळणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यामुळे शरीर थंड ठेवणं तितकं गरजेचं आहे. शुबमन गिलला शतकी खेळीनंतर उकाड्यात फलंदाजी करणं कठीण जात होतं. त्याला स्नायूंचा ताण जाणवत होता. त्यामुळे फिजिओथेरपिस्टने त्याला गळ्याभोवती पांढरा टॉवेल गुंडाळायला सांगितलं. हा टॉवेल थंड पाण्यात भिजवलेला असतो आणि घाम शोषून घेतो. त्यामुळे फलंदाजाला असह्य उकाड्यापासून तात्पुरता दिलासा मिळतो. भारतीय परिस्थितीत फलंदाजांना जास्त वेळ फलंदाजी करता यावी यासाठी अनेकदा याचा वापर केला जातो.

शुबमन गिलला मानेचा त्रास

शुबमन गिलला मानेचा त्रास आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात त्याला हा त्रास जाणवला होता. त्यामुळे फलंदाजी अर्धवट सोडून जावं लागलं होतं. त्यानंतर मैदानात परतला नाही. त्यानंतर आयपीएल स्पर्धेतही शुबमन गिलला या त्रासाला सामोरं जावं लागलं होतं. मोठी खेळी करताना अनेकदा या समस्या येतात. त्यामुळे शुबमन गिलने खबरदारी म्हणून पांढरा टॉवेल गळ्याभोवती बांधला होता.

Follow Us
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...
मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक
Uddhav Thackeray : मराठवाड्याच्या रखडलेल्या प्रकल्पांवरून ठाकरे सेना आक्रमक, संभाजीनगरात आंदोलन