AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलं

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर अखेर भारतीय संघाने नाव कोरलं आहे. अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला आणि वर्ल्डकप आपल्या नावावर केला. अंतिम सामन्यातील विजय सोपा नव्हता. हा सामना कुठे फिरला त्याबाबत कर्णधार हरमनप्रीत कौरने सांगितलं.

India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलं
India Champion: विजयाचं पारडं भारताच्या बाजूने कधी झुकलं? कर्णधार हरमनप्रीतने त्या निर्णयाबाबत सांगितलंImage Credit source: BCCI Women Twitter
| Updated on: Nov 03, 2025 | 1:16 AM
Share

वुमन्स वनडे वर्ल्डकप 2025 स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण अफ्रिकेला पराभूत केलं आणि जेतेपद आपल्या नावावर केलं. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभल केला आणि विजयाची चव चाखली. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा दक्षिण अफ्रिकेच्या बाजूने लागला होता. कर्णधार लॉरा वॉल्वार्डने या प्रथम गोलंदाजी स्वीकारली आणि भारताला फलंदाजी निमंत्रण दिलं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 7 गडी गमवून 298 धावा केल्या. तसेच विजयासाठी 299 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठताना कर्णधार लॉरा वॉल्वार्डने कडवी झुंज दिली. एक वेळ अशी आली होती की हा सामना हातून निघून जातो की असं वाटत होतं. कारण एका बाजून लॉरा खंबीरपणे भारतीय गोलंदाजांचा सामना करत होती. पहिल्या विकेटसाठी 51 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी भारताला खूपच झुंजावं लागलं. पण या विकेटसाठी हरमनप्रीत कौरने टाकलेले फासे योग्य पडले आणि टीम इंडिया सामन्यात आली.

कर्णधार हरमनप्रीत कौरने सामन्यानंतर सांगितलं की, ‘जेव्हा लॉरा आणि सुने फलंदाजी करत होत्या. तेव्हा सामना त्यांच्या बाजूने झुकलेला दिसत होता. मी फक्त शफाली तिथे उभी असल्याचे पाहिले. तिने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याचा विचार केला आणि मला वाटलं की आज तिचा दिवस आहे. मला वाटले की मला माझ्या अंतर्मनाचं ऐकावं लागेल. जर माझे मन म्हणत असेल तर मला तिला किमान एक षटक द्यावे लागेल. हा निर्णय आमच्यासाठी टर्निंग पॉइंट होता. जेव्हा ती संघात आली, तेव्हा आम्ही तिला बोललो की आम्हाला 2-3 षटके लागतील. ती म्हणाली की जर तुम्ही मला गोलंदाजी दिली तर मी दहा षटके टाकेन. तिचे श्रेय तिला जाते, ती खूप सकारात्मक होती आणि ती संघासाठी तिथे होती.’

शफाली वर्माने अंतिम फेरीत जबरदस्त कामगिरी आणि विजयाची शिल्पकार ठरली. तिने फलंदाजीत 78 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकार मारत 87 धावा केल्या. तसेच गोलंदाजीतही योगदान दिलं. शफाली वर्माने 7 षटकं टाकली आणि 36 धावा देत दोन गडी बाद केले. तिच्या या कामगिरीमुळे भारताला विजयाची चव चाखता आली. शफाली वर्मा म्हणाली की, ‘मी सुरुवातीलाच म्हणाले होते की देवाने मला काहीतरी चांगले करण्यासाठी येथे पाठवले आहे आणि ते आज दिसून आले. आम्ही जिंकलो याचा खूप आनंद आहे आणि मी ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. ते कठीण होते पण मला स्वतःवर विश्वास होता.’

Follow Us
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा, शिंदे, चाकणकर अन्..
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आला समोर
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला... बड्या नेत्याच्या दाव्याने राजकारणात खळबळ
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्
मोठी बातमी! प्रवाशांचा श्वास गुदमरला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्रेस
ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याचं धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच मोठं
Omraje Nimbaklar | ओमराजेंच्या निकवर्तीय नेत्याने धाराशिवमध्ये ठाकरेंच्या सभेआधीच केलं मोठं विधान, पुन्हा...
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री
CM Devendra Fadnavis | केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना पितृशोक, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री कुटुंबीयांच्या भेटीला
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत...
लवकरच ठाकरे गटात मोठी चलबिचल दिसेल, त्यांचे आमदार शिंदेंकडे कैफियत... बड्या नेत्याने एक एक करत सगळंच सांगितलं
एकच खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री
खळबळ! सियानं लग्नासाठी नकार दिला होता? प्रकरणात आणखी एकाची एन्ट्री; त्याला सगळंच... डोकं चक्रावणारा खुलासा
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन
भाजपमध्ये हे काय घडतंय? मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमातच दोन नेत्यांमध्ये रुसवारुसवी... कारण अत्यंत चकित करणार
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची
शिवसेना मोठ्या तयारीत? उदय सामंतांकडून वडेट्टीवारांना पक्षप्रवेशाची ऑफर?