IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 26 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत.

IPL 2022, Purple Cap : पर्पल कॅपच्या यादीत कोणता खेळाडू आघाडीवर? तुमचा आवडता खेळाडू नेमका कुठे? जाणून घ्या
पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे.Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: May 21, 2022 | 10:09 AM

मुंबई : दरवर्षी आयपीएल (IPL 2022) स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे (Purple Cap) क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. शुक्रवारी सीजनमध्ये राजस्थान रॉयल्सने (RR) ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात संघाने चेन्नई सुपर किंग्जला (CSK) पाच विकेट्सने पराभूत करून गुणतालिकेत क्रमांक-2 गाठला. नाणेफेक जिंकल्यानंतर धोनीच्या CSK ने स्कोअरबोर्डवर 150 धावा केल्या होत्या. ज्याला प्रत्युत्तर म्हणून दोन चेंडूंपूर्वी लक्ष्य गाठले गेले. यशस्वी जैस्वाल (44 चेंडूत 59 धावा) यानंतर रविचंद्रन अश्विनने 23 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. रियान परागसोबत त्याची चांगलीच जम बसली. यासह चेन्नईने 14 सामन्यांतील 10व्या पराभवासह आपला प्रवास संपवला. यानंतर आयपीएलच्या पर्पल कॅपमध्ये काय बदल झालाय पाहुया…

पर्पल कॅपचा मानकरी कोण?

पर्पल कॅपच्या यादीत पहिल्या क्रमांकावर युझवेंद्र चहल आहे. त्याने सर्वाधिक 26 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. दुसऱ्या स्थानी वानिंदू हसरंगा आहे. त्याने 24 विकेट घेतल्या आहेत. तिसऱ्या स्थानी कगिसो रबाडा आहे. त्याने 22 विकेट घेतल्या आहेत. चौथ्या स्थानी उमरान मलिक आहे. त्याने देखील 21 विकेट आयपीएलच्या या सीजनमध्ये घेतल्या आहेत. पाचव्या स्थानी कुलदीप यादव आहे. त्याने 20 विकेट घेतल्या आहेत.

पर्पल कॅपच्या शर्यतीतील टॉप पाच गोलंदाज

गोलंदाज विकेट दिलेल्या धावा
युझवेंद्र चहल26462
वानिंदू हसरंगा 24362
कागिसो रबाडा23406
उमरान मलिक 22444
कुलदीप यादव21419

कोणाला दिली जाते पर्पल कॅप

दरवर्षी आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यानंतर ऑरेंज आणि पर्पल कॅपकडे क्रिकेट रसिकांचं लक्ष असतं. कारण आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेंज कॅप दिली जाते, तर सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅपने सन्मानित केलं जातं. स्पर्धा सुरु असताना ऑरेंज आणि पर्पल कॅपचे मानकरी सतत बदलत असतात.

हे सुद्धा वाचा

राजस्थानचा नववा विजय

राजस्थानचा 14 सामन्यांतील हा नववा विजय आहे . संघाचे नाव लखनौ सुपर जायंट्सच्या 18 गुणांच्या बरोबरीचे आहे परंतु चांगल्या नेट रनरेटमुळे ते दुसऱ्या स्थानावर आहेत.

पॉईंट्स टेबलचं गणित

कालच्या सामन्यानंतर आयपीएलचा पॉईंट्स टेबल बघितल्यास राजस्थान रॉयल्सच्या विजयात आणखी एका सामन्याच्या विजयाची भर पडली आहे. पॉईट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स पहिल्या क्रमांकावर आहे. या संघाने एकूण 14 सामने खेळले आहेत. त्यापैकी 10 सामन्यात त्यांना विजय मिळालाय तर 4 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. दुसऱ्या स्थानी राजस्थान रॉयल्स आहे. या संघाने कालचा धरून एकूण 14 सामन्यांपैकी नऊ सामन्यात यश संपादन केलंय. तर पाच सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागलाय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.