AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विनोद कांबळीला बरबाद कोणी केलं? इंग्लंडच्या सर्वात जवळच्या मित्राचा धक्कादायक खुलासा

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या कठीण परिस्थितीमधून जात आहे. विनोद कांबळीचा मित्र आणि यॉर्कशायर क्लबमध्ये एकेकाळी संघातील साथीदार असलेल्या खेळाडूने विनोद कांबळीबद्दल काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.

विनोद कांबळीला बरबाद कोणी केलं? इंग्लंडच्या सर्वात जवळच्या मित्राचा धक्कादायक खुलासा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 30, 2025 | 5:46 PM
Share

भारतीय क्रिकेट संघाचा माजी स्टार फलंदाज विनोद कांबळी सध्या कठीण परिस्थितीमधून जात आहे. विनोद कांबळीचा मित्र आणि यॉर्कशायर क्लबमध्ये एकेकाळी संघातील साथीदार असलेल्या खेळाडूने विनोद कांबळीबद्दल काही जुन्या आठवणी सांगितल्या आहेत. अनेक लोक विनोद कांबळीची मोठ्या प्रेमानं आठवण काढतात. काहींना तर अजूनही विनोद कांबळीच्या त्याकाळातील असामान्य टॅलेंट आणि कॉन्फिडंसवर विश्वास बसत नाही. त्या काळात सचिन तेंडूलकर यॉर्कशायर काउंटी चॅम्पियन्सशिपमध्ये खेळलेला पहिला भारतीय क्रिकेटर ठरला होता. कांबळी तेंडूलकरचा लहाणपणीचा मित्र होता, त्यानंतर तो देखील सचिन तेंडूलकर सोबत इथे पोहोचला आणि एका क्लबमध्ये सहभागी झाला.

कांबळीचा मित्र असलेल्या नासा हुसैन याने नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली, त्यामध्ये त्याने विनोद कांबळी याच्या 90 च्या दशकातील अनेक आठवणी सांगितल्या आहेत. पुढे बोलताना तो म्हणाला की, सचिन यॉर्कशायर क्लबमध्ये सहभागी झाला होता. एक दक्षिण आशियाई खेळाडू यॉर्कशायर क्लबमध्ये सहभागी होणं ती त्या काळात फार मोठी गोष्ट होती, यापेक्षाही मोठी गोष्ट तेव्हा घडली जेव्हा सचिन कांबळीला घेऊन आला आणि तो देखील क्लबसोबत जोडला गेला.तोपर्यंत मी अशा एकाही खेळाडूला पाहिलं नव्हतं जो बॉलला एवढं जोरात मारतो.

जेव्हा विनोद कांबळी फलंदाजीसाठी उतरायचा तेव्हा आपला प्रत्येक बॉल सिक्स कसा जाईल यावरच त्याचं लक्ष असायचं, मी त्यापूर्वी असा खेळाडू पाहिला नव्हता. त्यानंतर त्याने इंग्लंडविरोधात द्विशतक ठोकलं, विनोद कांबळी आज करोडपती व्यक्ती असता, मात्र त्याने दारूमध्ये सगळं गमावलं, आजही त्याचे अनेक मित्र त्याची आठवण काढतात. त्याला लागलेलं दारूचं व्यसन त्याचं आजारपण याबाबत चिंता व्यक्त करातात. तो पैसे सांभाळून ठेवण्यात आणि बचत करण्यात कधीच चांगला नव्हता, असं हुसैन याने म्हटलं आहे.

त्याच्या अजून एका मित्रानं त्याची आठवण सांगताना म्हटलं की, एक दिवस आम्ही सर्व मित्र बसलो होतो, तेव्हा विनोद कांबळी आणि सचिन तेंडूलकर सोडले तर आमच्या सर्वांकडे पार्टटाईम जॉब होते. मी त्याला पार्टटाईम नोकरीचा देखील सल्ला दिला होता, मात्र तो म्हटला की आम्ही आमचा फोकस फक्त क्रिकेटवर केंद्रीत करणार आहोत, त्याने नोकरी केली नाही. त्याने पुढे असंही म्हटलं की जेव्हा विनोद भारतात आला, तेव्हा त्याने आपल्या वडिलांकडून सर्व पैसे घेतले आणि आपल्या मित्रांवर खर्च केले, तो पैशांची कधीच बचत करत नव्हता.

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.