स्मती मानधनाशिवाय ‘या’ दोन नावांचीही चर्चा, कोणाच्या गळ्यात पडणार टीम इंडियाच्या कर्णधारपदाची माळ?

हरमनप्रीतने कर्णधारपद सोडलं. आता टीम इंडिया महिला संघ नव्या कर्णधाराच्या शोधात आहे. त्यामुळे कर्णधार म्हणून नेमकं कोण समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

स्मती मानधनाशिवाय या दोन नावांचीही चर्चा, कोणाच्या गळ्यात पडणार टीम इंडियाच्या कर्णधारपदाची माळ?
Who Will be the new Team India captain
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 06, 2026 | 6:48 PM

टीम इंडियाच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्व फॉरमॅटमधील कर्णधारपद सोडले आहे. तिने आता फक्त खेळाडू म्हणून कारकीर्द सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला असून तिने महिला संघासाठी खूप महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. तिच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला असला तरी आता टीम इंडियाच्या महिला संघाला पुन्हा एकदा अशाच एका चेहऱ्याची गरज आहे, जी कर्णधार म्हणून संघाला आणखी प्रचंड यशाच्या मार्गावर घेऊन जाईल. त्यासाठी अनेक चेहरे समोर येत आहेत. स्मृती मानधना ही आघाडीवर असली तरीही तिच्याशिवाय आणखी कोणाची नावे कर्णधारपदासाठी चर्चेत आहेत. त्याबद्दल जाणून घेऊयात.

दरम्यान, हरमनप्रीतने देशासाठी कर्णधार म्हणून आणि एक वैयक्तिक खेळाडू म्हणूनही अतिशय चांगली कामगिरी केली आहे. पण तिने आता कसोटी, टी२० आणि वनडे या तिनही फॉरमॅटमधून कर्णधारपद सोडलं आहे. यामागचं कारण सांगायचं झाल्यास हरमनप्रीत कौरचा सध्याचा फॉर्म हे एक प्रमुख कारण आहे. ३७ वर्षीय हरमनप्रीत कौरच्या कर्णधारपदाखाली संघ विजय मिळवत आहे. मात्र, या विजयांच्या छायेत फलंदाज म्हणून हरमनप्रीतची वैयक्तिक कामगिरी काही प्रमाणात खराब झाली होती. त्यामुळे तिच्यावर काही प्रमाणात टीकाही होत होती. यामुळेच तिचे कर्णधारपद धोक्यात आल्याचीही चर्चा होती. पण आता त्यानंतर आता कर्णधार म्हणून सर्वात मोठी दावेदार आहे ती स्मृती मानधना. आता तिला भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार बनवण्याबद्दलची चर्चा सुरू झाली आहे. मानधनाने कर्णधारपद स्वीकारावे यासाठी बऱ्याच काळापासून आग्रह धरला जात होता.

Loading...

स्मृतीशिवाय इतरही दोन खेळाडू आहेत, ज्यांची टीम इंडियाच्या महिला कर्णधार पदासाठी दावेदार म्हणून पाहिलं जात आहे.  दीप्ती शर्मा ही टीम इंडियाची एक अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडू असून तीही टीमची नवी कर्णधार म्हणून निवडली जाऊ शकते. जेमिमाह रॉड्रिग्ज हिचेही नाव या स्पर्धेत आहे. तिच्याकडे एक युवा पर्याय आणि नेतृत्वक्षम खेळाडू म्हणून पाहिले जाते. दोघींचा खेळ अतिशय उत्तम असून आता निवडकर्ते नेमके कोणाला संधी देणार आणि कोणाच्या गळ्यात पडणार कर्णधारपदाची माळ याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us