Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव की शुबमन गिल, टीम इंडियाचा कर्णधार कोण? अशी आहे अपडेट

आशिया कप 2025 स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची ही रंगीत तालीम आहे. त्यामुळे स्पर्धेतून संघ बांधणीत हातभार लागणार आहे. असं असताना आशिया कप स्पर्धेत कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात असेल? याबाबत उत्सुकता आहे.

Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव की शुबमन गिल, टीम इंडियाचा कर्णधार कोण? अशी आहे अपडेट
Asia Cup 2025: सूर्यकुमार यादव की शुबमन गिल, टीम इंडियाचा कर्णधार कोण? अशी आहे अपडेट
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 14, 2025 | 4:30 PM

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी आता अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. तसेच ही स्पर्धा युएईत होणार असल्याने एक आठवडा आधीच सरावासाठी तिथे पोहोचावं लागणार आहे. अशा स्थिती भारतीय संघाची घोषणा पुढच्या आठवड्यात होणं आवश्यक आहे. अशा स्थितीत बीसीसीआय 19 किंवा 20 ऑगस्ट रोजी आशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा करू शकते. पण हा संघ जाहीर करण्यापूर्वी कर्णधारपदाची माळ कोणाच्या गळ्यात असेल याबाबतची उत्सुकता आहे. टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिल असेल की सूर्यकुमार यादव याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. सध्या टीम इंडियाच्या टी20 संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर असून संघ चांगली कामगिरी करत आहे. पण सध्या सूर्यकुमार यादववर शस्त्रक्रिया झाली असून त्यातून तो अजून सावरलेला नाही. त्यामुळे क्रीडाप्रेमींच्या मनात संभ्रम आहे.

सूर्यकुमार यादवला 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत कर्णधार म्हणून ग्राह्य धऱलं जात आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवकडेच कर्णधारपदाची धुरा असणार आहे. दुसरीकडे, कसोटी क्रिकेटमध्ये शुबमन गिल पर्वाचा उदय झाला आहे. पहिल्याच कसोटी मालिकेत गिलच्या नेतृत्वात टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी आहे. अनुभव नसल्याने सुरुवातीला त्याच्या निवडीवर टीकास्त्र सोडलं होतं. पण शुबमन गिलने फलंदाजी आणि कर्णधारपदाची जबाबदारी योग्यरित्या पेलली. गिलने या मालिकेत सर्वाधिक 754 धावा केल्या. तसेच मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. शुबमन गिलच्या नेतृत्वात आयपीएल स्पर्धेत गुजरात टायटन्सने चांगली कामगिरी केली आहे.

शुबमन गिल 2024 पासून टी20 क्रिकेट आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी आणि कसोटी मालिकेनंतर टी20 पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. अशा स्थितीत भविष्याचा विचार करता शुबमन गिलकडे उपकर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेनंतर शुबमन गिलला कर्णधारपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. भविष्याच्या दृष्टीने शुबमन गिलला तयार केलं जाऊ शकतं. तीन फॉर्मेट तीन कर्णधार हे गणित काही जमणारं नाही. त्यामुळे वनडे आणि टी20 संघाचं कर्णधारपद शुबमन गिलला मिळू शकतं.