सारा तेंडुलकरला अर्जुनच्या प्रेमाबाबत सगळं काही माहिती होतं, सोशल मीडियावरून अशी देत होती हिंट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने वयाच्या 25व्या वर्षी साखरपुडा उरकला आहे. सोनियासोबत असलेली मैत्री प्रेमात बदलली आणि आता साखरपुडा पार पडला असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण इथपर्यंत अर्जुनचा सर्व प्रवास साराला माहिती होता. ती याबाबत हिंट देत होती, पण....

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्या मुलाच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. कारण सचिन तेंडुलकरच्या आयुष्यात काय घडतं? याबाबत त्याच्या चाहत्यांना कायम उत्सुकता राहिली आहे. आता त्याच्या मुलाचा साखरपुडा गुपचूपपणे उरकल्याने चर्चा तर होणारच ना.. अर्जुन तेंडुलकरने घई कुटुंबियातील सानिया चंडोकसोबत नवी इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहे. मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत अर्जुन आणि सानियाने एकमेकांना साखरपुड्याची अंगठी घातली. अचानकपणे आलेल्या बातमीमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं. नेमकं कसं काय जुळलं वगैरे वगैरे… पण सारा तेंडुलकरला या दोघांच्या नात्याबाबत आधीच माहिती होती. सारा तेंडुलकर सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने याबाबत हिंट दिली होती. तिने या दोघांचा साखरपुडा पार पडण्यापूर्वीच साराने अर्जुनच्या होणार्या पत्नीसोबतचा फोटो शेअर केला होता. तेव्हा तिने कॅप्शनही लिहीली होती.
सारा तेंडुलकरने काय सांगितलं होतं?
सारा तेंडुलकरने मार्च 2025 मध्ये अर्जुन तेंडुलकरच्या होणाऱ्या पत्नीसोबत एक फोटो शेअर केला होता. तेव्हा तिने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, ‘फॉरएव्हर माय प्लस वन…’ असं लिहित तिने हिंट दिली होती. या कॅप्शनच्या माध्यमातून ती लवकरच तेंडुलकर कुटुंबात सहभागी होणार आहे. तिने लिहिलेली पोस्ट पाच महिन्यानंतर खरी ठरली आहे. दरम्यान, तेंडुलकर आणि घई कुटुंबातील कोणीही या साखरपुड्याबाबत कोणतेही विधान केलेलं नाही. समारंभाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केलेले नाहीत.
View this post on Instagram
सानिया इन्स्टाग्रामवर करतंय साराला फॉलो
रिपोर्टनुसार, सानिया अर्जुनची बालपणीची मैत्रीण आहे. त्यामुळे सोशल मीडियावर यांचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. इतकंच काय तर सारा आणि सानिया या देखील मैत्रिणी आहेत. सानिया चंडोक इन्स्टाग्रामवर तशी सक्रिय असते. पण तिने तिचं खातं खासगी ठेवलं आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 3500 फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ती नेमकं काय करते हे इतरांना कळत नाही. दुसरीकड़े, सानिया मिस्टर पॉज ब्रँडची संस्थापक आहे. हा पाळीव प्राण्यांच्या स्किनकेअरशी संबंधित ब्रँड आहे.
