वैभव सूर्यवंशीचा अंदाजच निराळा! फॅनला शिकवली अदबीची भाषा; नेमकं काय घडलं? पाहा व्हायरल VIDEO
Vaibhav Sooryavanshi Response to Young Fan Goes Viral: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी वैभव सूर्यवंशीचा VIDEO चर्चेत आला आहे. अभिषेक शर्मासाठी फॅनला सूचना दिली आहे.

एशिया कप रायझिंग स्टार्समध्ये वैभव सूर्यवंशी आणि अभिषेक शर्मा चाहत्यांना ऑटोग्राफ देत होते. एक तरुण चाहता दोन्ही खेळाडूंना नावाने हाक मारत होता, हे वैभवच्या लक्षात आले. त्याने त्या चाहत्याला मध्येच थांबवले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आज, इंडिया ‘अ’ संघ पाकिस्तान ‘अ’ संघाविरुद्ध खेळत आहे. दोन्ही संघांनी आपापले मागील सामने जिंकले आहेत.
नेपाळविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीची बॅट शांत होती. अभिषेक शर्माही स्वस्तात बाद झाला. मात्र तिलक वर्मा आणि कुमार कुशाग्र यांच्या शतकांमुळे भारताला 332 धावांचा डोंगर उभा करता आला. प्रिन्स यादव आणि हर्षित राणा यांनी गोलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली. प्रिन्सने पाच आणि हर्षितने चार बळी घेतले, ज्यामुळे नेपाळचा संघ 26 धावांवर ऑलआऊट झाला. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आजचा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करेल.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ, आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये नेपाळवर भारताच्या विजयानंतर चित्रित करण्यात आला होता. अभिषेक शर्मा आणि वैभव सूर्यवंशी सीमारेषेवर चाहत्यांना ऑटोग्राफ देत होते. त्याचवेळी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूंना पाहून उत्साहित झालेल्या एका मुलाने आपला फोन काढून फोटोसाठी विचारले. तो ‘अभिषेक आणि वैभव’ असे म्हणत होता. तेव्हा वैभवने त्याला मध्येच थांबवत म्हटले, अभिषेक भैया, अभिषेक नाही. यानंतर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
रुषांच्या आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी खेळला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार अब्दुल समदने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दोहा येथील वेस्ट एंड पार्क आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने दमदार सुरुवात केली आहे.
शमिल हुसेन आणि माझ सदाकत यांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. आयुष बडोनीने 23 चेंडूंमध्ये 33 धावा करणाऱ्या शमिलला बाद केले. त्यानंतर हर्षित राणाने रोहेल नझीरला बाद केले. हसन नवाझ आणि सदाकत खेळपट्टीवर आहेत.