Under-19 World Cup 2026: अंडर 19 वर्ल्डकप जिंकल्यावर का पैसा मिळत नाही? जाणून घ्या
ICC Under-19 World Cup: अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेला अवघ्या काही तासाने सुरुवात होणार आहे. भारताचा पहिला सामना अमेरिकेशी होणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. चला जाणून घेऊयात या स्पर्धेबाबत...

अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून यंदा 16वं पर्व आहे. ही स्पर्धा झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. झिम्बाब्वेतील सामने क्विंस स्पोर्ट्स क्लब, हरारे स्पोर्ट्स क्लब आणि हरारेतील ताकशिंगा स्पोर्ट्स क्लबमध्ये होतील. तर नामिबियातील सामने विंडहोकच्या नामीबिया क्रिकेट स्टेडियम आणि एचपी ओव्हल मैदानात होतील. या स्पर्धेत एकूण 24 सामने होणार असून दोन्ही देशात प्रत्येकी 12 सामने होतील. बाद फेरीचे सामने झिम्बाब्वेत खेळले जातील. क्वींस स्पोर्ट्स क्लब आणि हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये 3 आणि 4 फेब्रुवारीला उपांत्य फेरी आणि 6 फेब्रुवारीला हरारेमध्ये अंतिम सामना खेळला जाईल. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, बांग्लादेश, इंग्लंड, आयरलँड, पाकिस्तान, न्यूजीलंड, श्रीलंका, दक्षिण अफ्रीका, वेस्ट इंडीज, अफगानिस्तान, जापान, अमेरिका, नामीबिया आणि स्कॉटलँड हे संघ सहभागी होतील. अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेत डीआरएसचा वापर केला जाणार नाही. पण प्रत्येक सामन्यात टीव्ही पंच असतील.
भारताचा पहिलाच सामना अमेरिकेशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. कर्णधार आयुष म्हात्रेच्या नेतृत्वात भारतीय संघ सज्ज आहे. आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशीकडून फार अपेक्षा आहेत. नुकतंच त्याच्या नेतृत्वात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध वनडे मालिका खेळली गेली. या मालिकेत भारताने 3-0 ने विजय मिळवला. असं असताना अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेबाबत अनेकांना माहिती नाही.
विजयी संघाला बक्षिसाची रक्कम मिळते का?
विजयी संघाला बक्षिसाची रक्कम दिली जात नाही. या स्पर्धेचा हेतू फक्त आणि फक्त युवा खेळाडूंचा विकास हा असतो. पण त्या त्या देशाचे क्रिकेट बोर्ड संघाला बक्षीस म्हणून काही ना काही रक्कम देतात. जसं की 2024 मध्ये भारताने जेतेपद मिळवलं होतं. तेव्हा बीसीसीआयने प्रत्येक खेळाडूला 30 लाख रुपये दिले होते. वुमन्स अंडर 19 टी20 वर्ल्डकप 2025 जिंकल्यानंतर बीसीसीआयने संपूर्ण संघाला 5 कोटी दिले होते.
भारताचे सामने
- 15 जानेवारी भारत विरुद्ध अमेरिका
- 17 जानेवारी भारत विरूद्ध बांगलादेश
- 24 जानेवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड