
वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर आता वेध लागलेत ते ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे.. भारतीय संघ 15 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला वनडे सामना 19 ऑक्टोबरला होणार आहे. हा वनडे सामना क्रीडाप्रेमींच्या दृष्टीने खूपच खास आहे. कारण जवळपास सहा महिन्यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली या मालिकेत खेळणार आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. दुसरीकडे, रोहित शर्मा संघात असताना शुबमन गिलकडे वनडे संघाचं नेतृत्व का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रश्नावर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी उत्तर दिलं आहे. शुबमन गिलकडे जबाबदारी सोपवण्याचं खरं कारण काय ते गौतम गंभीरने स्पष्ट केलं.
शुबमन गिलने नुकतीच वनडे संघाची धुरा हाती घेतली आहे. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा पहिला दौरा आहे. शुबमन गिलने सांगितलं की, ‘मला वाटते की तो वनडे कर्णधार होण्यासाठी पात्र होता. गिलने खूप मेहनत घेतली आहे आणि सर्व निकष पूर्ण केले आहेत. प्रशिक्षक म्हणून, जर एखादा खेळाडू योग्य गोष्टी बोलत असेल. योग्य गोष्टी करत असेल. कठोर परिश्रम करत असेल. योग्य दृष्टिकोन बाळगत असेल आणि पुढे येत नेतृत्व करत असेल, तर प्रशिक्षक आणखी काय पाहीजे? आणि मला माहित आहे की हे त्याच्यासाठी कठीण आहे.’
प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, ‘इंग्लंड दौरा खूपच कठीण होता. इंग्लंड दौऱ्यात खऱ्या अर्थाने शुबमन गिलची कसोटी लागली. पाच कसोटी सामना आणि अडीच महिने इंग्लंडसारख्या मजबूत संघाशी सामना करायचा. टीमही अनुभवी नव्हती. गिलला अजून काय सहन करायचं आहे?’ आता शुबमन गिलची ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी लागणार आहे. कारण आता वनडे वर्ल्डकप 2027 पर्यंत त्याच्याकडे संघाची धुरा असणार आहे. अशा स्थितीत त्याच्यासाठी कठीण काळ सुरु झाला आहे. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत हरवणं वाटतं तितकं सोपं नाही. त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ चिवट आणि फॉर्मात आहे. त्यामुळे गिलची परीक्षा असणार आहे.